एक्स्प्लोर
रामदास कदम उद्धव ठाकरेंचं कुत्रं!, नितेश राणेंचं ट्विट
खासदार नारायण राणे यांच्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेली टीका आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी त्यांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे.
मुंबई : खासदार नारायण राणे यांच्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेली टीका आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी त्यांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे.
'स्व. माननीय बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील. त्यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे…रामदास कदमच्या रुपात! सतत भुकत असतो..त्याला हे माहित नाही.. भुकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं झोंबणारं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी रामदास कदम यांनी केली होती. अपेक्षेप्रमाणे या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना रामदास कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे. काय म्हणाले होते रामदास कदम शुक्रवारी रत्नागिरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांच्यावर रामदास कदम यांनी केली होती. ”या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे बघावं तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावं. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही”. असं कदम म्हणाले होते.स्व.मान बाळासाहेब असतील,राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात.. उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे.. रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही.. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!
— nitesh rane (@NiteshNRane) December 14, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement