आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा; दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नितेश राणे आक्रमक
Nitesh Rane on Disha Salian Death Case SIT: एसआयटी स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत मलादेखील बोलवा. आदित्य आणि मला समोरा समोर बोलवा, असं म्हणत नितेश राणेंनी मागणी केली आहे.
Nitesh Rane on Disha Salian Case : नागपूर : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Death) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. "आम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी टाकली आहे. खरा खुनी आहे जो काल विधानसभा परिसरात दिसला त्याच्यावर लवकर कारवाई होईल", असं नितेश राणे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यासह (Maharashtra News) देशभर गाजत असलेल्या बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची (SIT For Disha Salian Suicide Case) विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याबाबत राज्य सरकार आजच SIT ची घोषणा करु शकते.
त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. नितेश राणे म्हणाले, "काल खरा खुनी आपल्या वडिलांसोबत आला होता. सर्वांची उत्तरं या निमिताने बाहेर येणार आहेत. मी देखील थांबलोय. एसआयटी स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत मलादेखील बोलवा. आदित्य आणि मला समोरा समोर बोलवा."
संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल (Nitesh Rane on Sanjay Raut)
आदित्य ठाकरेला पोहोचवा असेच संजय राऊतला वाटतंय. अडीच वर्षे त्यांचे सरकार होते तेव्हा हे काय गोट्या खेळत होते. अनिल परब यांनी स्वतः म्हणाले 13 जूनला पार्टी होती. त्यांना देखील एसआयटी चौकशीत बोलवावे. दोन वेळा क्लोजर रिपोर्ट बदलला आहे. आयोगाला अनिल परब याचे मालवणीत फोन येत होते की साक्ष बदला, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला.
मागासवर्गीय आयोग
संजय राऊत मागास वर्गीय आयोगात चहा द्यायला जातो का? राज्य सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार. संजय राऊतसारखे खिचडी चोर छगन भुजबळ नाहीत. संजय राऊत तुझी केस वेगळी आहे भुजबळ यांची वेगळी आहे, असं नितेश राणे म्हणाले.
तुझ्या मालकाचे सरकार होते तेव्हा नागपूर, ठाणे महापालिकेत चौकशी का लावली नाही? खिचडी खाल्ली, मातोश्री चालवली ना? मग आता जा चौकशीला सामोरे, असंही नितेश राणे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT; राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश