(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New year Celebration | नववर्षाचं सेलिब्रेशन पर्यटकांना 'महागत'
सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्याऱ्यांसाठी अनेकांचेच पाय पर्यटन स्थळांकडे वळले. पण, तिथं हॉटेलच्या चढ्या दरांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
मुंबई : 2020 या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरी धकाधकीपासून दूर जात अनेकांनी थर्टी फर्सट साजरा करण्याला प्राधान्य दिलं. (new year 2021) नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळावर गर्दी झालीय. शहरातींल संचारबंदीमुळं पर्यटकांनी कोकण, (Mahabaleshwar) महाबळेश्वरकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. पण, तिथे मात्र त्यांना एका भलत्याच अडचणीचा सामना करावा लागला आहे.
एमटीडीसी, मेक माय ट्रीप, ओयो रुम्स अशा अनेक माध्यमांतून आणि पर्यायांच्या सहाय्यानं पर्यटन स्थळी राहण्याची सोय करण्याला अनेकजण पसंतीत देतात. पण, यावेळी मात्र राहण्याची सोय करण्यासाठी अपेक्षेहून जास्त दर मोजावे लागत आहेत.
(alibaug)अलिबागमध्या हॉटेलच्या दरांत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, माथेरान, मुरु़डमध्ये हे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं याच अनुभवासाठी महाबळेश्वरला अनेकांची पसंती आहे. इथं हॉटेलचे दर तब्बल 40 टक्क्यांनी वाढले आहेत. तिथं दापोली, गुहागरमध्येही या दरांमध्ये 5-10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. हजार रुपयांच्या दरांत उपलब्ध असणारी हॉटेलची खोली मिळवण्यासाठी आता 1200 पेक्षाही जास्त रुपये पर्यटकांना मोजावे लागत आहेत.
सावधान...! यंदा थर्टी फस्टला दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची ब्लड टेस्ट, सहकाऱ्यांवरही गुन्हा!
ल़ॉकडाऊनच्या काळात जवळपास बरेच महिने हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनावर अवलंबून असणारे इतरही व्यवसाय ठप्प होते. त्यामुळंच ही दरवाढ आणि एकंदर परिस्थितीचं हॉटेल मालकांकडून समर्थन होत आहे. किंबहुना काही पर्यटकही या दरवाढीमागची कारणं लक्षात घेत परिस्थिती निभावून नेत आहेत.
मुख्य म्हणजे ख्रिसमस आणि नववर्ष या दरम्यानच्या काळात पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्यांचा ओघ पाहता येणारा पुढचा आठवडाही या दरांमध्ये अशीच तेजी पाहायला मिळेल असं सांगण्यात आलं आहे.