(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neelam Gorhe: केंद्रीय गृहमंत्री असले तरी राजकारणात प्रत्येकाला समसमान संधी; राणा-कडू वादात उपसभापती नीलम गोऱ्हेची स्पष्टोक्ती
Maharashtra Politics: अमित शाह हे जरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री असले तरी देशाच्या राजकारणात प्रत्येकाला समान संधी असते. असे परखड मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बोलताना व्यक्त केलीय.
Maharashtra News : 'राजकीय पक्षानी आपआपसात समन्वय राखून सभा आणि मैदानाच्या वेळा व तारखा राखून मार्ग काढला तर अशा गोष्टी निर्माण होणार नाही. अमित शाह (Amit Shah) हे जरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री असले तरी देशाच्या राजकारणात प्रत्येकाला समसमान संधी असते. तर काही बाबतीत विवेकाने निर्णय घ्यावा लागतो', असे परखड मत विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी व्यक्त केले आहे. अमरावती (Amravati Lok Sabha Constituency) येथे काल प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि राणा दाम्पत्या यांच्यामध्ये मैदानावरून झालेल्या वादप्रसंगी त्या बोलत होत्या.
बच्चू कडू यांच्या भावना कायम तीव्र असतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचा राग लवकर येतो. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असतं. मात्र, या प्रकरणी त्यांची समजूत काढून देखील फार परिणाम होणार नसल्याचे देखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे नेतृत्व - नीलम गोऱ्हे
'महायुतीमध्ये संभाजीनगरच्या जागेचा उमेदवार जाहीर झाला आहे. तर आता केवळ नाशिक आणि मुंबई येथील जागावाटपाचा प्रश्न सुटणे बाकी आहे. 20 मे ला त्या भागात निवडणूक होत आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य उमेदवार जाहीर होईल, असा विश्वासही नीलम गोऱ्हे यांनी बोलताना व्यक्त केला. संभाजीनगरची जागा ही पूर्वापार शिवसेनेकडेच होती, त्यामुळे ती आम्हाला सुटली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. याचा फायदा मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांना होईल. असेही त्या म्हणाल्या. संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मी त्या ठिकाणी गेले होते, त्यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकतीने त्या ठिकाणी उपस्थित होते. खऱ्याअर्थांना संपूर्ण महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची अस्मिता जिवंत ठेवण्याचे काम संभाजीनगरची जागा ठेवते', असे मला वाटत असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संयमी, धोरणी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे नेतृत्व आहे. त्यामुळे उरलेल्या जागा देखील लवकर सुनिश्चित करण्यात येतील. एकीकडे सांगली सारख्या जागबद्दल महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे वाभाडे काढण्यात येत असताना, महायुतीत कुठलाही जागेला उशीर झाला, असे बोलणे उचित नसल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
संजय राऊतांकडनं सभ्य भाषेची अपेक्षा नाही- नीलम गोऱ्हे
नवनीत राणांबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलत असताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, संजय राऊतांकडनं सभ्य भाषेची अपेक्षा आपण करू शकत नाही. कारण एकीकडे ते स्वतःला गुंड म्हणून घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्योदयाच्या जागी सूर्यास्त होणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या