NCP Crisis : राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवलं जाणार? निर्णय होईपर्यंत हे चिन्ह आम्हाला द्या, गोठवू नका; शरद पवार गटाची मागणी
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील शरद पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाने केला.
नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आगोयामध्ये सुनावणी सुरू असून राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आले. जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं, गोठवू नये अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रीय अध्यक्षपदावर झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही बेकायदेशीर असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) गटाने सांगितलं. शरद पवार हे आपल्या मर्जीप्रमाणे पक्षाचा कारभार करतात असा आरोपही अजित पवार गटाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची लढाई निव़डणूक आयोगात सुरू असून दोन्ही बाजूंनी आज जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थिती लावली.
आजच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) आणि मनिंदर सिंह (Maninder Singh) यांनी युक्तिवाद केला.
निर्णय होईपर्यंत हे चिन्ह गोठवू नका
राष्ट्रवादीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्हं आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar : निवडणूक आयोगातील सुनावणी
- दुपारी चारच्या सुमारास निवडणूक आयोगातील सुनावणीला सुरुवात
- स्वत: शरद पवार सुनावणीसाठी निवडणूक आयोगात दाखल
- शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित
- महाराष्ट्र आणि नागालँडचेही आमदार आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा युक्तिवाद
- पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा - अजित पवार गट
- जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा
- पक्षाची स्थापना कशी झाली? पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाचा युक्तीवाद
- 55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा
- महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे - अजित पवार गट
- पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा प्रकारे होऊ शकतात - अजित पवार गटाचा सवाल
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे.
- शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला.
- राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, शरद पवार गटाकडून युक्तिवाद
- मुख्य प्रतोद आमच्या बाजूने, त्यामुळे 9 आमदारांवरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर - अजित पवार गट
- सर्वाधिक अधिकार शरद पवारांकडे त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही - शरद पवार गट
- शरद पवारांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर- अजित पवार गटाचा मोठा दावा
- 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये बैठक. पण त्याच्या आधी 1 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ते आधीच जाहीर झालं होतं, केवळ औपचारिकता म्हणून 10 सप्टेंबरची निवड झाली का?
- 588 जणांच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड ही शरद पवारांनीच केली होती.
- राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर निवडी या लोकशाहीला धरून नाहीत.
राष्ट्रवादीतल्या चिन्हाच्या लढाईचा घटनाक्रम
-2 जुलै रोजी अजित पवार गटाचा शपथविधी
- शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी कॅव्हिएट दाखल
-अजित पवार गटानं 30 जून रोजीच झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा केला, 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचाही दावा
-निवडणूक आयोगानं त्यावर दोन्ही बाजूंना नोटीसा देत 8 सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं
-दोन्ही बाजूची कागदपत्रं पाहिल्यानंतर आयोगानं आता या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.