एक्स्प्लोर

Sharad Pawar : शरद पवार अहमदनगर अन् नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर; भुजबळांच्या भेटीनंतर तात्काळ दौरा, ही आहेत कारणं 

Sharad Pawar : शरद पवार हे शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आयोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे.

मुंबई : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.  या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांनी या भेटीबाबत कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत नेहमीप्रमाणे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते. अशातच आता शरद पवार हे शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आयोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीनंतर दोनच दिवसात शरद पवार नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने काही राजकीय समिकरणांची जुळवा जुवळ शरद पवार करतात का, हे पाहणे या निमित्याने महत्वाचे ठरणार आहे.

भुजबळांच्या भेटीनंतर  नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शरद पवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. स्वर्गीय अशोक भांगरे हे पिचड यांचे अकोले तालुक्यातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. काँग्रेस, भाजप आणि आता राष्ट्रवादी (पवार गट) मध्ये सक्रिय असताना त्यांचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला असून त्यांची पत्नी सुनीता भांगरे आणि मुलगा अमित यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाच्या देखील नजारा लागल्या आहेत.

पवार- भुजबळ भेटीचे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क 

राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण निर्माण करेल अशी घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला गेले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटेन, राहुल गांधींना (Rahul Gandhi) देखील भेटेन असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी स्पष्ट केलं आहे. 

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी अचानक गेले, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये देखील उलट सुलट चर्चा सुरु झाली. किंबहुना विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्यावतीने आरक्षणाच्या लढ्यात सत्ताधारी पक्षाला येत असलेल्या अपयशामुळे शरद पवारांना भागीदार करण्यासाठीचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील भुजबळ भेटीला जाणं म्हणजे सरकारचाच डाव असल्याचं म्हंटलं आहे

छगन भुजबळांनी मात्र आजच्या भेटीवर बोलताना शरद पवारांनी आरक्षणाच्या लढ्याबाबत लवकरच आपण एकत्रित बसून चर्चा करु असं आश्वासन दिल्याची माहिती दिली आहे. परंतु तरीदेखील राजकारणात कधी केव्हा काय होईल कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे राज्यातील आगामी काळातील एका वेगळ्या राजकारणाची तर ही नांदी नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.
 
इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, किसान सभेचा हल्लाबोल  
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पातील घोषणा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, किसान सभेचा हल्लाबोल  
Embed widget