एक्स्प्लोर

ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

Anil Deshmukh : निवडणुका लांबणीवर नेण्याचा निर्णय सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने घेतला, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय.

Maharashtra Assembly Election 2024 : भाजप (BJP) आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने (Election Commission) निर्णय घेतला आणि निवडणुका लांबणीवर गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आता विधानसभा निवडणुक घ्यायला हे सरकार घाबरत आहेत. या निवडणुका कश्यापद्धतीने पुढे ढकलाव्या यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.

आमची मागणी आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे. निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचा सत्कारच होईल. किंबहुना निवडणुका लांबणीवर नेण्याचा निर्णय सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने घेतला, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलाय. ते नागपूर (Nagpur News) येथे बोलत होते. 

सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय- अनिल देशमुख

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यात साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार, हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय.

ई-पीक पाहणीची अट शासनाने रद्द करावी- अनिल देशमुख

राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे मोसंबी, संत्री गळून पडल्या, याकडे शासनाचे लक्ष नाही, मी स्वतः पाहणी केलीय. राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. गेल्या वर्षी चुकीच्या धोरणामुळे कापूस-सोयाबीनला भाव मिळाला नाही. तर शेतकऱ्यांना 10 हजराची मदत जाहीर केल्यावर ई-पीक पाहणीची अट टाकली.  शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती अपलोड केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने इ-पीक पाहणीची अट टाकली आहे त्यांना मदत अद्याप मिळत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीची अट शासनाने रद्द करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केलीय.

आमचे सरकार आल्यावर बहि‍णीला महिन्याला 3 हजार देणार

लाडक्या बहि‍णीला 3 हजार दिले, केवळ लाडक्या खुर्चीसाठी ही योजना सरकारने आणली आहे. ही योजना यांनी केवळ 3-4 महिन्यासाठी आणली आहे. 3-4 महिन्याची आर्थिक तरतूद त्यात केली आहे. मात्र आमचे सरकार आल्यावर 5 वर्षे ही योजना आम्ही राबवू आणि लाडक्या बहि‍णीला महिन्याला 3 हजार देणार, असेही अनिल देशमुख म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde : एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल, शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठकMahayuti Oath Ceremony BJP T Shirt : शपथविधीसाठी 'एक हैं तो सेफ है'चे खास टीशर्टBJP Ministers List : शपथविधीला अवघे काहीच; भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोरABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
Embed widget