एक्स्प्लोर

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 

पुन्हा येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. एकत्र येण्याचं नेमकं कारण काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.  

Pune :  गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असंही वक्तव्य केलं होतं. सातत्यानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येत आहेत. दोघांमध्ये संवाद देखील या ठिकाणी होत असल्याचे दिसत आहे. आजही पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. एकत्र येण्याचं नेमकं कारण काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.  

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार

येत्या 9 जून रोजी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. साखरेच्या उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबत प्रत्यक्षिके देखील यावेळी दाखवली जाणार आहेत. पायलट प्रोजेक्टबद्दल सुद्धा या कार्यक्रमातून साखर कारखान्याच्या मालकांना माहिती दिली जाणार आहे. 

कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना काय फायदा होईल याबाबत चर्चा

आजच पुण्यात साखर संकुलात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित होते.  पण या बैठकीची टायमिंग महत्त्वाचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं, यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष महाविकास आघाडीत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget