Sharad Pawar : निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharad Pawar : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयागाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगांच्या निकालानंतर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "निकाल लागल्यानंतर चर्चा करता येत नाही. निकाल स्वीकारायचा, नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही परीणाम होत नसतो. लोक नवीन चिन्ह स्वीकार करतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद झाला त्यावेळी त्यांचं गाय आणि वासरू हे चिन्ह होतं. इंदिरा गांधी यांच्या हातून ते चिन्ह गेलं. त्यानंतर त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह घेतलं आणि निवडणुकीला सामोरं गेल्या. लोकांनी त्यांना आणि नव्या चिन्हाला स्वीकारलं. आता देखील नवीन चिन्ह लोक मान्य करतील. चिन्ह गेलं याचा फारसा परिणाम होत नसतो, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.
महत्वाच्या बातम्या