(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawab Malik : माझी रेकी केली जातेय, नवाब मलिकांनी फोटो पोस्ट करत केलाय दावा
Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची माळ लावली होती. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवाय, भाजप नेत्यांच्या मदतीने समीर वानखेडे वसूली रॅकेट चालवत असल्याचा दावाही मलिकांनी केला होता. नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टात खटलाही सुरु आहे. त्यातच नवाब मलिक यांनी आपली रेकी केली जात असल्याचा दावा केलाय. मलिकांनी शुक्रवारी रात्री ट्वीट करत याबाबतचं वक्तव्य केलेय. मलिकांनी रेकी करणाऱ्या व्यक्तीचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
नवाब मलिक यांनी ट्वीट करत आपली रेकी केल्याचा दावा केलाय. रेकी करणाऱ्या व्यक्तींचा गाडीसह फोटो पोस्ट केलाय. यासोबत त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘ गेल्या काही दिवसांपासून गाडीत बसून हे लोक माझी आणि शाळेची रेकी करत आहे. जर यांना कुणी ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत जे लोक आहेत. त्यांना मला सांगायचेय की, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला भेटा, सर्व माहिती देईल.’ नवाब मलिकांनी दोन व्यक्तींचे फोटो पोस्ट करत हा दावा केलाय. दोन लोक रेकी करत असलेल्या गाडीचा क्रमांक MH 47 AG 2466 असा आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या हातात कॅमेराही दिसतोय. त्यामुळे नवाब मलिकांच्या दाव्यानं चांगलीच खळबळ माजली आहे. मलिकांची रेकी करण्यास कुणी सांगितलं? याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की 'रेकी' कर रहे हैं.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.
जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा pic.twitter.com/ZAmJhqEWoL
संबधित बातम्या :
वानखेडे विरूद्ध नवाब मलिक खटल्याचा निकाल सोमवारी
समीर वानखेडेंसाठी काशिफ खान करतो वसूली; नवाब मलिक यांचा आरोप