एक्स्प्लोर
Advertisement
दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या निधनाने पंढरपुरात शोककळा
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचं कोरोनामुळे सोलापुरात निधन झालं आहे.
पंढरपूर: पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या भोसे गावातील पाटील कुटुंबावर कोरोनाने सर्वात मोठा घाला घातला आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव पाटील यांचे दोन चिरंजीव आणि एका सख्खा भावाचा कोरोनामुळे धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचं कोरोनामुळे सोलापुरात निधन झालं आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तालुक्याच्या राजकारणात तिसरी शक्ती म्हणून भोसे गावचे पाटील यांची ओळख होती. भोसे गावात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यावर दहा दिवसांपूर्वी पाटील कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला होता.
पहिल्यांदा राजू बापू पाटील यांच्या चुलत्यांचे कोरोनाने निधन झालं. त्यानंतर चारच दिवसांमध्ये राजू बापू पाटील यांचे धाकटे बंधू महेश पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि आज राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने पाटील कुटुंबीयांनी तिघांना गमावले आहे.
राजूबापू यांचे लहान बंधू महेश हे घरीच उपचार घेत होते मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात येत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वात धक्कादायक म्हणजे या कुटुंबाचे कर्ते असणारे राजू बापू पाटील यांचे देखील कोरोनाने आज मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान निधन झाले.
दहा दिवसाच्या अंतरात एकाच कुटुंबातील तीन कर्ते पुरुष कोरोनाचे बळी ठरले आहेत. पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद घटनेने तालुका हादरून गेला आहे. शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय कुटुंब म्हणून पाटील कुटुंबाची ओळख असून राष्ट्रवादीतील स्ट्रॉंग नेत्याचे निधनाने कार्यकर्त्यांसह नागरिक शोकाकुल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
सोलापूर
Advertisement