जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा भाजपला टोला
निवडणुकीच्या काळात काही विशिष्ट फेसबुक पेज चालवून खालच्या पातळीवर टीका केली जात होती. त्यांना पैसे कोण पुरवत होते, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
सोलापूर : कोरोनाच्या कठीण काळात भाजपच्या नेत्यांचं लक्ष राजकारण करण्याकडे जास्त होतं. म्हणून लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली. ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात फोटो मॉर्फ करुन टीका करण्यात आली, त्यावेळी आम्ही तक्रार द्यायला गेल्यावर आमच्या पैकी कोणाची ही एफआयर दाखल करुन घेण्यात आली नाही. मात्र जर आपल्या एखाद्या वक्तव्याचा जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
निवडणुकीच्या काळात काही विशिष्ट फेसबुक पेज चालवून खालच्या पातळीवर टीका केली जात होती. त्यांना पैसे कोण पुरवत होते, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर भाजप नेत्यांविरोधात सुरु असलेल्या ट्रोलिंग विरोधात कारवाई करण्यासाठी काल भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भेट घेतली, यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांचे समर्थन करत नाही. त्यांनी दिलेल्या तक्रारी योग्य असतील तर त्याविरोधात कारवाई केली जाईल. मात्र आपल्या काळात काय चालायचं याचाही विचार करायला हवा, याची आठवण जयंत पाटील यांनी करुन दिली.
दरम्यान, आयएफएससी सेंटर मुंबईवरुन गुजरातला हलवण्याच्या निर्णयवारुन देखील जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. विधानसभेत आम्ही याबाबत प्रश्न विचारला होता, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केलं नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार तसेच तत्कालीन राज्य सरकार काम करत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
संबधित बातम्या