Jayant Patil : कायदा डावलून तुरुंगात टाकायचा भाजपकडून निश्चय - जयंत पाटील
Jayant Patil : अल्पसंख्याक मंत्री आमि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Jayant Patil : अल्पसंख्याक मंत्री आमि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांनी परस्परविरोधी आंदोलने केली. महाविकास आघाडीने भाजप आणि ईडीविरोधात घोषणाबाजी केली. तर नबाव मलिकांच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गंभीर आरोप असतानाही राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही? याचा विचार शिवसेनेच्या नेत्यांनी करायला हवा, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा देणार नाहीत.
पिंपरी चिंचवड येथे जयंत पाटील बोलत होते, यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. आमदार महेश लांडगे यांनी नवाब मलिक प्रकरणी केलेल्या वक्तव्यवरून आशा पध्दतीची वक्तव्य करणं विधानसभा सदस्याना शोभत नाही. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेला केसचा बेस चुकीचा आहे. कायदा डावलून तुरुंगात टाकायचा निश्चय भाजपकडून सुरू आहे. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील एक व्यक्ती आहे. तो जेल मध्ये आहे, त्यासोबत नवाब मलिक यांचा 2007 साली व्यवहार झाला आहे, त्याबद्दल स्पष्टीकरण घ्याला संधी द्याल हवी होती. पण नवाब मलिक यांना कोणतीही संधी देण्यात आली नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल. महापालिका निवडणुकीत आघाडी संदर्भात आमची पहिली पसंती महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्र आले पाहिजे ही असणार आहे. कुठं अवास्तव माणग्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वा शनिवारी पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचा देखील जयंत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, युवक प्रदेशाध्यक्ष, युवक कार्याध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष , माजी आमदार विलास लांडे,शहराध्यक्ष अजित गव्हाणे , महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट , माजी महापौर संजोग वाघेरे, युवती जिल्हाध्यक्ष वर्षा जगताप , युवक जिल्हाध्यक्ष इमरान शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष यश साने, वसंत बोराटे, संध्या सोनवणे, निलेश पांढरकर, सचिन चिंचवाडे, उत्तम आल्हाट आदी उपस्थित होते.