Jayant Patil : जाणून बुजून दाऊदशी संबंध जोडून नवाब मलिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न, जयंत पाटील यांचे टीकास्त्र
Jayant Patil :मी गृहमंत्री असताना अशा अनेक घटना मुंबईत आहेत की इनोसंट बायार यांचा काय दोष आहे. जाणून बुजून दाऊद याच्याशी संबंध जोडणे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप आणि ईडीच्या कारवाईवर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले. त्याना कोर्टात दाखल केल्यानंतर आमच्या वकिलांनी खुलासे केले आहेत. मंत्री असताना त्यांना पाच वाजता घेऊन जाणे त्यानंतर त्यांना समन्स देणे. हा सर्व प्रकार कायदा ढाब्यावर बसवून आहे, असे टीकास्त्र जयंत पाटील यांनी सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर तुरूंगात जाणारे मलिक हे राष्ट्रवादीचे दुसरे नेते आहेत. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन केले आणि भाजप आणि ईडीवर टीका केली. तर भाजपकडूनही मलिक यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे.
सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत आहेत तर काही लोक षडयंत्र रचून राज्यातील प्रमुख नेत्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या प्रापर्टी संदर्भातील माझ्याकडे काही डिटेल्स आहेत. 10 हजार सेक्वरमिटर हे अतिक्रमण केले आहे. त्यात 1327 स्क्वेअर मीटर मोकळी जागा आहे. त्यामुळं अनेक आकडे बाहेर येत आहेत मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. सलिम पटेल यांच्या सोबत 2005 मध्ये जो करार केला त्यावेळी कोणताही गुन्हा दाखल नव्ह्ता. ही रितसर खरेदी केलेली जमीन आहे. या जागेवर अजुनही अतिक्रमण आहे. त्यांच्या घराच्या शेजारी ही जागा आहे. नवाब मलिक यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचा आणि पारकर यांचा काहीही संबंध नाही, असे जंयत पाटील म्हणाले.
कोणाचे पैसे थकवले नाहीत. जर तक्रार असेल तर किमान त्यांची संधी मांडायला वेळ दिला पाहिजे. मुनिरा पटेल यांच्या मातोश्री ने कोणतीही तक्रार दिली नाही. ज्याने पैसे दिले नाही त्याला अटक करायची की ज्याने रितसर खरेदी. केली त्याला अटक करायची. मी गृहमंत्री असताना अशा अनेक घटना मुंबईत आहेत की इनोसंट बायार यांचा काय दोष आहे. जाणून बुजून दाऊद याच्याशी संबंध जोडणे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांचा काहीही संबंध नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
Nawab Malik Admitted Hospital : ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली, जे. जे. रुग्णालयात दाखल
Nawab Malik : नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयानं केल्या मान्य
Nawab Malik Arrested : मलिक कुटुंबियांचे ED वर गंभीर आरोप, रिमांड कॉपीत म्हटले 'महसूल मंत्री'
Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेनंतर ED ने सत्र न्यायालयात काय दावा केला? काय म्हणाले नवाब मलिक?
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live