एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर?
अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते मुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी करुन पक्षप्रवेश करत असल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतल्यानंतर महाडिकांची भाजपशी जवळीक वाढत असल्यानं पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. मात्र, खुद्द महाडिकांनी एबीपी माझाशी बोलताना भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळलं आहे.
आपण फक्त सहकारी कारखान्याच्या कामासाठी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं महाडिक यांनी म्हटलं आहे. अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते मुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी करुन पक्षप्रवेश करत असल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतल्यानंतर महाडिकांची भाजपशी जवळीक वाढत असल्यानं पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी माझ्या कारखान्याच्या कामासाठी आलो होतो, राजकीय चर्चा झाली नाही. माझे चंद्रकांत दादांशी चांगले संबंध आहेत. जिल्ह्यातील असल्यामुळे ते संबंध आहेत, पण बाकी काही नाही. मी राष्ट्रवादीत आहे, भाजपमध्ये जाणार नाही, पवार साहेबांनी मला खूप मदत केली आहे. मला पक्षातील कुणाविरोधात नाराजी नाही, मी अस्वस्थ नाही, असेही महाडिक म्हणाले.
कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा 2 लाख 70 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. धनंजय महाडिक यांनी यापूर्वी शिवसेनेकडून 2004 च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता.
मंडलिकांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र 2009 मध्ये त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीराजेंना तिकीट दिलं होतं. त्यावेळी संभाजीराजेंचाही पराभव झाला होता. यानंतर राष्ट्रवादीने 2014 मध्ये धनंजय महाडिक यांना तिकीट दिलं आणि ते लोकसभेवर निवडून गेले होते. यंदा मात्र त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
विश्वजित कदम यांनीही भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले
भाजपात जाण्याच्या बातम्या काही माध्यमातून दाखवल्या जात आहेत. ज्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी भाजप प्रवेशाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर काँगेस आमदार विश्वजित कदम यांनी एका पत्राद्वारे हा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँगेस-राष्ट्रवादी मधील अनेक आमदार, नेते भाजपत येणार असल्याचा चर्चेला पेव फुटले आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँगेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांची भाजप प्रवेशाबबत शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये सांगलीतील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची देखील भाजप प्रवेशाबाबत काही दिवसांपासून तर्कवितर्क लढविले जात आहेत. विश्वजित कदम हे काँगेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement