एक्स्प्लोर

Sharad Pawar: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध, पक्षात दोन गट नाहीत'; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला उत्तर

निवडणूक आयोगाच्या नोटीसीला शरद पवार गटाने उत्तर देताना पक्ष आमचाच असून अजित पवार केवळ संभ्रम निर्माण केला आहे अशी माहिती दिली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, शिवाय कोणतेही वाद नाहीत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Answer to Election Commission)   यांनी निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून करण्यात आला होता. त्यानुसार अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. आता शरद पवार गटाने  उत्तर देताना पक्ष आमचाच असून अजित पवार केवळ संभ्रम निर्माण केला आहे अशी माहिती दिली आहे. 

अजित पवारांची मागणी फेटाळली पाहिजे

शरद पवार म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून पक्षात कोणतेही गट पडलेले नाहीत.   अजित पवार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर आमचा आक्षेप घेऊन आम्ही 3 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक प्रतिसाद दाखल केला होता. अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर  दावा करण्यात आलेली मागणी फेटाळावी. पक्षात दोन गट पडले आहेत याचा कोणताही पुरावा अजित पवारांकडे नाही. निवडणूक आयोगाने देखील कोणताही वाद आहे असे ठरवलेले नाही. याच आधारावर अजित पवार यांची कागदपत्रे फेटाळली पाहिजेत.

राष्ट्रवादीच्या चिन्हावर दावा करणे अकाली 

 घटनेच्या विरोधात काम करत असलेल्या प्रवृत्त व्यक्तींच्या अपरिचित गटाच्या चुकीच्या दाव्यांचे खंडन करण्यास आम्ही बांधील नाही. कारण, 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवार यांनी कोणतीही तक्रार केली नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला विरोध केला नव्हाता.  त्यामुळे याचिका दाखल करणे अकाली आहे,म्हणून  त्यांची मागणी नाकारली पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले. 

अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी पक्ष आपल्या सोबत असल्याबाबतचे दावे करणारे जे दाखले अजित पवार गटाने दिले ते देखील खोटे असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवलं त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं आम्ही सांगितलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं देखील सांगितलं आहे. 5 जुलैला त्यांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र 30 जूनचे आहे असं सांगितलं आहे.अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे आव्हाड म्हटले आहे. शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहे, असे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला अशी विरोधाभासाची भूमिका अजित पवार घेऊ शकत नाहीत, असेही जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024Mumbai Lok Sabha Elections : मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मतदान, कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाPraful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी...CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
Embed widget