एक्स्प्लोर
संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानची 'दुर्गामाता दौड' सुरु
नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सुद्धा या दौडमध्ये सहभागी होतात.

सांगली: नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील 'दुर्गामाता दौड'ला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. या दौडला 35 वर्षाची परंपरा आहे. यंदा दौडमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते. यावेळी ठिकठिकाणी दौड आणि भगव्या ध्वजाचे औक्षण केले जाते.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सुद्धा या दौडमध्ये सहभागी झाले होते. या दौडदरम्यान भिडे गुरुजींनी तैनात असलेल्या पोलिसांना काही सूचना दिल्या. तुम्ही या दौडच्या बंदोबस्तात असला, तरी डोक्यावर तुमची वर्दीतील टोपी किंवा पांढरी टोपी ठेवा, अशा सूचना भिडे गुरूजींनी पोलिसांना दिल्या.
नवरात्र उत्सव सार्वत्रिकपणे साजरा करण्यासाठी दुर्गामाता दौडची संकल्पना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी पुढे आणली. तरुणांमध्ये धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी 1982 साली संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडला सुरुवात केली.
या दौडनिमित्ताने शहरात नवरात्रोत्सवाची वातावरण निर्मिती केली जाते. मशाल, तलवारधारक, ध्वजधारक अग्रस्थानी असतात. ठिकठिकाणी घरासमोर रांगोळी काढून आणि औक्षण करून दौडीचे स्वागत करण्यात येते. शहरातील प्रमुख रस्त्यावरून दौड मार्गक्रमण करते. हजारो तरुण या दौडमध्ये शिवरायांचे नामस्मरण करीत सहभागी झालेले असतात.
दरम्यान, पुढील नऊ दिवस ही दौड शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून काढली जाते. दसऱ्याच्या दिवशी या दौडची सांगता होते. दौडच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त दौड मार्गावर तैनात करण्यात आला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























