Navratri 2022 : साडेतीन शक्तीपीठांसह राज्यभरातील देवींची प्रसिद्ध मंदिरं, ज्या ठिकाणी भक्तांचा मेळा भरतो
आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे.
Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. नवरात्रीच्या उत्सवात देवींच्या मंदिरात ठिकठिकाणी गर्दी होते. साडेतीन शक्तिपीठांसह अशा अनेक कुलदेवता राज्यभरात आहेत जिथं नवरात्रीसह वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात.
राज्यभरातील देवींची प्रसिद्ध मंदिरं
कोल्हापूर- अंबाबाई (Kolhapur Ambabai Mandir)
महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूरमध्ये आहे. वर्षभर इथं भाविक हजेरी लावतात. नवरात्रीत जास्त प्रमाणात भाविक येत असतात.
तुळजापूर- तुळजा भवानी माता (Tuljapur Tulja Bhabhani Mandir)
तुळजापूर देखील महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रासह आसपासच्या काही राज्यात तुळजाभवानी देवीचं विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो.
माहुरगड- रेणुका (नांदेड) (Mahur Gad Renuka Mata Mandir)
साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर येथील रेणुका देवीचे मंदिर. नवरात्रीमध्ये माहूरगडावर भक्तांची रीघ लागलेली असते.
वणी- सप्तशृंगी (नाशिक) (Nashik Vani Saptashrungi Mandir)
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तिपीठ आहे.
राज्यातील आणखी काही महत्वाची मंदिरं
डहाणू- महालक्ष्मी
विरार- जीवदानी
मुंबई- मुंबादेवी (Mumbai Mumbadevi Mandir)
मुंबई- महालक्ष्मी (Mumbai Mahalakshmi Mandir)
मुंबई- वज्रेश्वरी (भिवंडी)
मुंबई- शीतलादेवी
मुंबई- प्रभादेवी
मुंबई- दगडीचाळीची देवी (भायखळा)
सातारा- मांढरदेवी ( काळुबाई)
उस्मानाबाद- येडेश्वरी (येरमाळा) (Osmanabad Yermala Yedeshvari Mandir)
बीड- योगेश्वरी देवी
कारला- एकवीरा देवी
लातूर - रेणुकामाता (रेणापूर)
पुणे- चतुश्रृंगी (विद्यापीठ रोड)
पुणे- भवानी माता मंदिर (भवानी पेठ)
पुणे- महालक्ष्मी मंदिर (सारसबाग)
पुणे- तांबडी जोगेश्वरी (बुधवार पेठ)
पुणे- तळजाई माता
नाशिक- कालिका माता
चंद्रपूर- देवी महाकाली
धुळे- खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवी
अकलूज - आकलाई मंदिर
नागपूर - महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी
औरंगाबाद- कर्णपुरा देवी
औरंगाबाद (तीसगाव)- भांगसी माता
नागपूर- आग्याराम देवी मंदिर, गणेशपेठ
नाशिक- श्री भद्रकाली देवी
येवला- जगदंबा देवी
चांदवड- रेणुका देवी
भगूर - रेणुका देवी
इगतपुरी- घाटन देवी
जालना-मत्स्योदरी देवी
अहमदनगर- श्री क्षेत्र मोहटा
सोलापूर- हिंगुलांबिका मंदिर
सोलापुरातील हिंगुलांबिका देवीचे मंदिर जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीचे आहे. या देवीचे मूळ स्थान हे आत्ताच्या पाकिस्तान मधील बलुचिस्तान येथील आहे. हिंगुला नदीच्या बाजूला देवीचे स्थान असल्याने देवीचे नाव हिंगुलांबिका असे आहे. आख्यायिकेनुसार हिंगलासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्याने देवीचे नाव हिंगुलांबिका असल्याचे इथले पुजारी संजय तुकाराम हंचाटे सांगतात. भावसार समाजाची कुलदेविका म्हणून देखील हिंगुलांबिका देवीला ओळखले जाते.