Navneet Rana : मी देवाच्या सासुरवाडीतून आल्याचे म्हणत नवनीत राणांची वारकऱ्यांसोबत पायीवारी; वारीत फुगडीही खेळली
Navneet Rana In Wari : माजी खासदार नवनीत राणा यांनी आज वारकऱ्यांसोबत पायी वारीत सहभाग घेतलाय. यावेळी त्यांनी महिला पोलीस कर्मचारी आणि वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा देखील मनसोक्त आनंद घेतलाय.
सोलापूर : आषाढी सोहळा (Pandharpur Ashadhi Wari 2024) हा खरे तर वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च महासोहळा असतो . यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या पालखी सोबत पंढरपुरात येत असतात. दरम्यान सध्या अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात आहे. राज्यभरातून हजारो वारकरी (Ashadhi Wari 2024) वारीमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच या वर्षी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी वारीत सहभागी होत विठुरायाच्या चरनी नतमस्तक होताना दिसत आहे. अशातच आता माजी खासदार नवनीत राणांनी(Navneet Rana) देखील वारकऱ्यांसोबत पायी वारीत सहभाग घेतलाय. यावेळी त्यांनी महिला पोलीस कर्मचारी आणि वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा देखील मनसोक्त आनंद घेतलाय.
सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे पडुरंगाकडे साकडं
रुक्मिणी मातेच्या माहेरगावातून आणि देवाचा सासुरवाडी असलेल्या गावातून मी आली आहे. राज्यासह देशातील सर्व शेतकरी, कष्टकरी, कामकरी वर्ग विठ्ठलावर विश्वास ठेवून मोठ्या श्रद्धेने वारी करतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे मी आज पडुरंगांकडे घालणार आहे. इतकी वर्षे अमरावती येथे वारीला येणाऱ्या भाविकांची सेवा आम्ही करत आलो आहोत. यंदा देवाकडे येण्याचे भाग्य लाभले. पडुरंगाकडे हेच मागणे राहील कि सर्वांना सुखी समृद्धी आणि निरोगी ठेव.हेच माझे पडुरंगाकडे साकडं असल्याचे माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
माझा पराभव झाला, मात्र खोटे जास्त दिवस टिकत नसतं
यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधत टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीने खोटा प्रचार केल्याने माझा पराभव झाला. मी कुठे तरी कमी पडली असेल. असे असले तरी खोटे जास्त दिवस टिकत नसतं. हे विधानपरिषदेच्या निकालाने समोर आले आहे. विधानसभेला देखील महायुतीची सत्ता येणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार रवी राणा हे देखील उपस्थित होते.
पुढे बोलताना नवनीत राणा यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, काहीजण महाराष्ट्रा पेटविण्याचे काम करीत आहेत. त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, असा टोलाही जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांनी मारला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या