एक्स्प्लोर

Majha Impact: व्हीआयपी दर्शन बंद म्हणजे बंद, दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Pandharpur VIP Darshan : व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शनाचा लाभ  मिळाला आहे.

सोलापूर : पंढरपुरात (Pandharpur)  आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi)  काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते... यावेळी सर्वसामान्य तासनतास उभे असताना   व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात .एबीपी माझानं या संदर्भात बातमी दाखवली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे .  तसचं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आलीय. 

आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनरांगेत असताना काही मंडळी  व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात. एबीपीने आवाज उठवल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. आता याचे पुढचे पाऊल टाकत प्रशासनाने अशी  घुसखोरी रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 दोन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दिनांक 11 जुलै रोजी पारित केला आहे.

व्हीआयपी दर्शन पूर्णपणे  बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

12 जुलै रोजी रात्री 7 वाजता  रमेश उत्तमराव वाघिरे राहणार नांदेड तालुका गंगापूर, औरंगाबाद व  महेश वासुदेव घायतिडक राहणार उमरी पारगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या व्यक्तींनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन रांगेतून पदस्पर्शदर्शन रांगेत घुसखोरी केल्याचे सीसीटीव्ही चित्रणाद्वारे व सुरक्षारक्षकाने निदर्शनास आणून दिले होते . 

दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर  गुन्हा दाखल

तसेच श्रीच्या मुखदर्शन रांगेत सायंकाळी 6 वाजता व त्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली होती. या तिन्ही व्यक्तींनी घुसखोरी करून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने संबंधित व्यक्तीवर पंढरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.वाघिरे आणि  घायतीडक या दोन्ही व्यक्तीस मंदिर प्रशासनाने पोलीस विभागाच्या ताब्यात दिले आहे .  

व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ

व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शनाचा लाभ  मिळाला आहे. भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात आली आहे, या संदर्भात  ठेकेदाराला  नोटीस दिली. तसेच कर्मचाऱ्यांना भाविकांशी सौजन्याने वागण्याचे आदेश दिले आहेत. 

हे ही वाचा :

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रिंगण सोहळ्यात दुर्दैवी घटना; फोटोग्राफरचा मृत्यू, वारकऱ्यांमध्ये हळहळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रि‍पदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget