(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Naik : गणेश नाईक DNA चाचणीसाठी तयार; वकिलांची न्यायालयात माहिती
आतापर्यंत जे काही झालं ते सर्व समंतीने झालं असून त्याला बलात्कार मानू नये असा युक्तीवाद भाजप नेते गणेश नाईक यांच्या वकिलांनी केला आहे.
नवी मुंबई: महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमकविल्या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती एन.के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर यावर गुरुवारी निर्णय देण्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं. यावेळी गणेश नाईक हे डीएनए चाचणीसाठी तयार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. यावेळी सर्वांना धक्का बसला. तसेच नाईक गुन्हातील रिव्हॉल्वर देण्यास तयार आहेत, असेही वकिलांनी सांगितले.
त्याआधी दोन्ही केसच्या तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या कस्टडीची मागणी केली. नेरूळ पोलिसांनी बलात्कार प्रकरणामध्ये नाईक यांची मेडिकल करणे गरजेचे आहे, यासाठी कस्टडी पाहिजे अशी मागणी केली. तर बेलापूर पोलीस तपास अधिकाऱ्यांनी धमकावण्यात आलेल्या गुन्हात हत्यार जप्त करायाचे आहे, म्हणून त्यांची कस्टडी पाहिजे असे सांगितले. त्यामुळे जामीन देवू नका अशी विनंती कोर्टाला करण्यात आली. तर नाईक यांच्या वकिलांनी सर्व संमतीने झाले आहे, त्यामुळे याला बलात्कार मानू नये असा युक्तीवाद केला.
फिर्यादीवर बलात्कार होत होता, मनाविरुद्ध सबंध ठेवला जात होता असा धक्कादायक खुलासा महिलेच्या वकिलांनी केला. तसेच सध्या दोन वेळा नातेवाईका मार्फ़त फिर्यादि यांना गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आलीय, त्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल आहे, असे फिर्यादी वकील यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपा चौहान यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्यासोबत गेल्या 27 वर्षापासून आपण लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत असून त्यांच्यासोबतच्या संबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला आहे. गणेश नाईक यांनी आपल्या मुलाला वडिलांचे नाव द्यावे.
गणेश नाईक यांनी यासाठी नकार दिल्याने दीपा चौहान यांनी थेट पोलीस ठाणे गाठत त्यांच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दीपा चौहान यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितलं आहे.