एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील यांचा एकाच गाडीने प्रवास
शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या विकासकामांचं आज नाशिकमध्ये उद्घाटन होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकत्र दिसले.

नाशिक : आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, असा पुनरुच्चार शिवसेनेकडून वारंवार होत असला तरी नाशिकमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज नाशिकमध्ये एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकरही होते.
शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या विकासकामांचं आज नाशिकमध्ये उद्घाटन होतं. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंसह चंद्रकांत पाटील यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं.
खरंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांचा ताफा वेगवेगळा होता. परंतु दोन्ही नेत्यांनी ताफा सोडून दुसऱ्याच गाडीतून त्यांनी प्रवास केला. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या प्रवासाला सुरुवात झाली का? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका विमानातून प्रवास केला होता. तेव्हा देखील राष्ट्रवादी मनसेला सोबत घेणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
युती व्हायला हवी : मुख्यमंत्री
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपची युती होणे आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना-भाजपची आगामी निवडणुकांमध्ये युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मतांचं विभाजन टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजप पक्षाला एकत्र यावं लागेल. भाजप शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्याशी आपण कायम संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
हे युतीचं सरकार नाही तर केवळ भाजपचं
एकीकडे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत, मात्र शिवसेना सातत्याने स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी आगामी निवडणुका भाजपसोबत न लढता, स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच हे सरकार युतीचं नाही, तर केवळ भाजपचं असल्याचा दावाही रावतेंनी केला.
संबंधित बातम्या
युती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल: मुख्यमंत्री
कोणत्याही निवडणुकीत युती नाही: उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
