एक्स्प्लोर
नाशिक-नंदुरबार शिवशाहीला अपघात, 12 प्रवासी जखमी
नाशिकहून नंदुरबारला जाणारी शिवशाही बस आणि टँकरचा सटाणा-ताऱ्हाबाद रस्त्यावर अपघात झाला.

नंदुरबार : राज्यात शिवशाही बसच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नाशिकहून नंदुरबारला जाणारी शिवशाही बस आणि टँकरचा अपघात झाला. यामध्ये बारा ते पंधरा जण जखमी झाले आहेत.
नाशिकहून नंदुरबारला जात असलेल्या शिवशाही बसला सटाणा-ताऱ्हाबाद रस्त्यावर करंजवाडजवळ अपघात झाला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बस ढोलबारीजवळ पोहचली असता समोरुन येणाऱ्या गॅस टँकरवर आदळली.
ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं, तर टँकर रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. या भीषण अपघातात सुमारे 12 ते 15 जण जखमी झाले. त्यापैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मालेगावला हलवण्यात आलं, तर अन्य जखमींवर सटाणा आणि ताऱ्हाबाद येथे उपचार करण्यात आले.
याच मार्गावर दोन दिवसांपूर्वी एका बसचा अपघात झाला होता. सुदैवाने त्या अपघातातही प्रवासी बचावले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
