डोंगराळे हत्या प्रकरण! पोलिसांकडून 425 पानांचे आरोपपत्र दाखल, आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे हत्या प्रकरणी पोलिसांकडून 425 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Nashik Dongrale Crime News : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस (Malegaon Crime News) आली होती. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण केला असून अवघ्या 23 दिवसात तब्बल 425 पानांचे आरोपपत्र मालेगावच्या जिल्हा अप्पर सत्र न्यायलयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अवघ्या 23 दिवसात तब्बल 425 पानांचे आरोपपत्र दाखल
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाचा पोलिस तपास पूर्ण केला असून अवघ्या 23 दिवसात तब्बल 425 पानांचे आरोपपत्र मालेगावच्या जिल्हा अप्पर सत्र न्यायलयात दाखल करण्यात आले आहे..आज पुन्हा एकदा आरोपीला मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हजर केले असता आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने स्पेशल गॅझेट काढून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती केली असल्याने लवकरच ते हजर होऊन पुढील सुनावणी चालवतील. मात्र आरोपींच्या वतीने अटक ही बेकायदेशीर नसल्याचा अर्ज दाखल केला आहे. त्या अनुषंगाने कोर्टात आधी त्या अर्जावर सुनावणी होईल. फास्टट्रॅक कोर्टात ही केस असल्याने सदर या केसची सुनावणी लवकरात लवकर होईल. एकंदरीत या केसची लवकरात लवकर सुनावणी होऊन या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
16 नोव्हेंबर रोजी घडली होती घटना
16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर माहाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराची गंभीर दखल घेत कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून 10 लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:























