PM narendra Modi Pune Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिल्यांदाच पुण्यात मुक्काम; राजभवनाला छावणीचं स्वरुप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मुक्कामी असणार आहे आणि पुण्यातल्या याच राजभवनात ते मुक्कामी असणार आहे. पहिल्यांदाच मोदी पुण्यात मुक्काम करणार आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे मुक्कामी असणार आहे आणि पुण्यातल्या याच राजभवनात ते मुक्कामी असणार आहे. पहिल्यांदाच मोदी पुण्यात मुक्काम करणार आहे. त्यामुळे राजभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि या जाहीर सभेनंतर पंतप्रधान मोदी राजभवनात मुक्काम करणार आहेत. रात्री या परिसरातील पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
उद्या पुन्हा धाराशिव आणि माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असल्यामुळे मोदी आज पुण्यातच मुक्काम करणार आहे. त्यामुळे राजभवन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे त्यासोबतच राजभवनाच्या कुणालाही राजभवनाच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे. आज रात्री मुक्काम करुन मोदी उद्या सकाळी पुन्हा धाराशिव आणि माळशिरस कडे मोदी हे रवाना होणार आहेत
त्यासोबतच ज्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात दाखल होतील त्या मार्गावर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. पुण्यात जाहीर सभा पार पडणार आहे. बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची जाहीर सभा ही पुण्यात पार पडणार आहे.
मोदीच्या सभा स्थळाला छावणीचं रुप
पुण्यातील रेस कोर्स मैदानात मोदींची सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी साधारण दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्यात चारही मतदार संघाचे कार्यकर्तेदेखील असतील. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. बैठक व्यवस्थेपासून ते मोदी ज्या मार्गाने सभा स्थळी पोहचणार या सर्व मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांना या मार्गावर येण्यास परवानगी दिली जात नाही आहे. सभा स्थळी पोहचण्याच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यासोबतच पुण्यात उन्हाचा पारादेखील चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सभेसाठी आलेल्या नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.