एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सचिन अंदुरेच्या साथीनं दाभोलकरांवर गोळीबार केला, शरद कळसकरची कबुली
नोवैद्यकीय चाचणीत कळसकरने कबुली दिल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयकडून याबाबतचा एक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक मोठी माहिती कोर्टाच्या कामकाजात समोर आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरने सचिन अंदुरेच्या साथीनं दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.
मनोवैद्यकीय चाचणीत कळसकरने कबुली दिल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयकडून याबाबतचा एक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. 'गेल्या वर्षी जून महिन्यात अॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,' असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत 'सीबीआय'ला सांगितले.
VIDEO | दाभोलकरांवर गोळीबार केला, शरद कळसकरची कबुली | एबीपी माझा
सचिन अंदुरे कोण आहे?
सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.
शरद कळसकर कोण आहे?
शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement