एक्स्प्लोर
नोटाबंदी करुन मोदींनी लक्ष्मीचे तुकडे केले, राणेंचा घणाघात
कोल्हापूर : आर्थिक विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करुन लक्ष्मीचे तुकडे केले. इचलकरंजीतील वस्त्रोद्योग जिवंत ठेवण्याच्या खोट्या वल्गना करणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योग संपवण्याचे काम केल्याचा आरोप यावेळी नारायण राणेंनी केला. विदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या फडणवीसांना पश्चिम महाराष्ट्राचं वावडं आहे, असंही राणे म्हणाले. इचलकरंजी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
आर्थिक विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करुन लक्ष्मीचे तुकडे केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही केलेल्या योजनांचे नाव बदलून भाजप सरकारने त्याचे बारसे घातले, तर शिवसेनेने नागरिकांना अधोगतीकडे नेलं असल्याची टीका राणेंनी केली. नागरिकांनी जात-पात, धर्म विसरून वस्त्रोद्योग जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला मतदान करावं, असं आवाहन राणे यांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement