एक्स्प्लोर

युती तोडण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार, शिवसेना आमदाराचे आरोप, नांदेडमध्ये महायुतीत ठिणगी! 

सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकांवरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत

Nanded News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकांवरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 
नांदेडमध्येही राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत. अशोक चव्हाण यांनीच युती तोडली, युती तुटण्यास तेच 100 टक्के जबाबदार आहेत. असे हेमंत पाटील म्हणाले.

नेमकं काय म्हणाले हेमंत पाटील?

नांदेड जिल्हयात सगळे पक्ष आपल्या मर्जीने चालावे ही अशोक चव्हाण यांची भूमिका आहे. पैशांचा वापर करुन कार्यकर्त्यांची जमात नष्ट करण्याचा त्यांचा जुना प्रयोग असल्याची टीता आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली.  अशोक चव्हाण यांनीच युती तोडली, युती तुटण्यास तेच 100 टक्के जबाबदार आहेत असेही ते म्हणाले. 

एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले

नांदेडमध्ये शिवसेना भाजपाची युती व्हावी यासाठी, शिवसेनेच्या चारही आमदारांनी प्रमाणिक प्रयत्न केले. तीन आमदार अशोक चव्हाण यांच्या घरी दोनवेळा गेले. प्रत्येक ठिकाणी 20 टक्के जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला. मात्र, एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यामुळं युती तुटल्याचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले. युती तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये मनभेद निर्माण झाले आहेत. मी तिन्ही आमदारांना सांगितलं होतं , लेखी स्वरूपात प्रस्ताव घेऊन जा , कारण लोकांना सुद्धा कळालं असतं खरं खोटं काय? असं हेमंत पाटील म्हणाले.

मी म्हणेल तशाच पद्धतीने सगळ्या पक्षांनी जिल्ह्यात चाललं पाहिजे अशी अशोक चव्हाण यांची भूमिका

जाणीवपूर्वक युती करायची नाही. पैशाचा वापर करून कार्यकर्ता जमात नष्ट करायचा प्रयोग मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यात सुरु असल्याची टीका हेमंत पाटील यांनी केली आहे. मी म्हणेल तशाच पद्धतीने सगळ्या पक्षांनी जिल्ह्यात चाललं पाहिजे, अशी त्यांची सातत्याने भूमिका राहिलेली आहे. युती तुटण्यास 100 टक्के अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आमचे चार आमदार आहेत. त्यांच्या बरोबरीने आमची देखील ताकद आहे. तरीही आम्ही 20 टक्के जागा मागितल्या होत्या. त्या दिल्या असत्या तर वेगळं चित्र असतं. कार्यकर्त्यांना बळ मिळालं असतं असे हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

आमच्या निवडणुका असतात तेव्हा युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या असतात तेव्हा करायची नाही

आमच्या निवडणुका असतात तेव्हा युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या असतात तेव्हा करायची नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतात असं हेमंत पाटील म्हणाले. मला त्यांचा अनुभव आहे, नवीन आमदारांना अनुभव नव्हता, आता त्यांना अनुभव आला असे हेमंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

ठाकरे गटाच्या 16 पैकी 11 उमेदवारांची माघार, रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोडी, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget