Nanded: विदर्भात झालेल्या संततधार पावसाने नांदेडचा सहस्त्रकुंड धबधब्यानं घेतलं आक्राळविक्राळ रुप, निसर्गाचं रुपडं डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं धबधब्याकडे..
विदर्भात झालेल्या संततधार पावसाने नांदेडचा सहस्त्रकुंड धबधब्यानं घेतलं आक्राळविक्राळ रुप
Nanded News: नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने (Nanded Rains) चांगलीच हजेरी लावली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यासह विदर्भात झालेल्या संततधार पावसाने सहस्त्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ स्वरूप आलं होतं. धबधबा सुरु झाल्यानं परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
विदर्भातील अनेक भागांत सुरू असलेल्या संततधार पावसाने पैनगंगा नदी सध्या दुथडी भरून वाहतेय. त्यामुळे पैनगंगा नदीवर नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याला अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त झालंय. एरवी जून महिन्यातच प्रवाहित होणारा धबधबा यंदा मात्र जुलै अखेर ओसंडून वाहतोय.
पर्यटकांची पावले वळू लागली धबधब्याकडे
मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता आपोआप डोंगरदर्यांकडे वळू लागलेली आहेत. दरम्यान, नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याने आक्राळविक्राळ रुप घेतलं असून याठिकाणी पर्यटकांनी याभागात प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान, धोकादायक पद्धतीने सध्या पर्यटकांची स्टंटबाजी सुरु असून यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्टंटबाजी कधी थांबणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून विविध पर्यटन स्थळावर घडलेल्या दुर्घटनानंतरही पर्यटक सोशल मीडियावर काहीतरी टाकण्याच्या नादात धोकादायक पद्धतीने फोटोसेशन रील करताना आढळत आहेत.
चिखलदा पर्यटनस्थळी पर्यटकांची तुफान गर्दी
सातपुडा पर्वतरांगेतील एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा सध्या पर्यटकांच्या गर्दीने भरून गेले आहे. शेकडो फूट दरीचा काठावर असलेल्या दगडावर बसून हूल्लडबाज तरुणांनी फोटोसेशन करत जीवघेणी स्टंटबाजी केल्याचे दिसून आले. चिखलदरीत सध्या पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून इथून कोसळलं तर थेट शेकडो फूट दरीत कोसळेल हे दिसत असतानाही पर्यटक धोकादायक पद्धतीने फोटोसेशन करताना दिसत आहेत.
पालघरमध्येही चिचोंटी धबधब्यावर तरुणाईची दंगामस्ती
पावसाळी पर्यटनासाठी (Rain) सध्या तरुणाई ग्रुप-ग्रुपने आणि मित्रांसमवेत बाहेर पडत आहे. त्यातच, पर्यटनस्थळांसाठी धबधबा (Waterfall) किंवा पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या जात आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांना भेटी देताना हुल्लडबाजी आणि दंगा मस्ती करतानाचेही अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. त्यातूनच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे, स्थानिक प्रशासनाकडून अशा काही धोकादायक ठिकाणांवर पर्यंटकांना बंदी घातली आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणार्या पालघर जिल्ह्याच्या वसईतील चिचोंटी धबधब्याजवळ शनिवारी पर्यंटकांनी एकच गर्दी केली होती. बंदी हुकूम डावलून पर्यंटक येथे हुल्लडबाजी करत असल्याचे काही सुजाण पर्यटक व नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच येथील नायगाव पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन पर्यटकांना पोलिसी खाक्या दाखवा. तसेच, येथील सर्वच पर्यटकांना धबधबा आणि येथील मनाई आदेश असलेल्या पर्यटन ठिकाणाहून बाहेर काढले.
हेही वाचा:
चिचोंटी धबधब्यावर तरुणाईची दंगामस्ती; पोलिसांनी इंगा दाखवला, तरुणाईने ठोकली धूम