एक्स्प्लोर

10 कोटी रुपये द्या नाहीतर, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देईन; नांदेडमध्ये धमकीच्या ईमेलनं खळबळ

10 कोटी रुपये द्या नाहीतर, नांदेडचं जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देईन, अशी धमकी देणाऱ्या ईमेलनं खळबळ निर्माण झाली होती. अखेर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा धमकीचा ईमेल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नांदेड : 10 कोटी रुपये द्या नाही तर, नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि इतर महत्वाची कार्यालय बॉम्बने उडवून देईन, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर आलेल्या धमकी देणाऱ्या मेलनं एकच खळबळ उडाली. दरम्यान, धमकीचा मेल पाठवणाऱ्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी देत त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व कार्यालयांची लिस्ट जोडत या आरोपीनं मेल केला होता. 

काल (रविवारी) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर एक मेल आला त्यामध्ये 12 कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय त्यासोबतच इतर महत्वाची कार्यालयं आणि संपूर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकले जाईल अशा आशयाचा संदेश या ई मेलमध्ये लिहिलेला होता. सदर मेलची माहिती नांदेड गुन्हे शाखेच्या तांत्रिक मदतीने हा मेल पाठविणाऱ्याची माहिती घेण्यात आली. या ई मेलमध्ये दरमहा 5 कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी मेसेज लिहिलेला होता. त्याचप्रमाणे हॉटस्पॉटची क्षमता 1 किलोमीटर लिहिलेली होती. तसेच मेल करणाऱ्या इसमाने दरमहा 5 कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही लिहिलं होतं.

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने  या प्रकरणी विविध अंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली. त्यानुसार नाव शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ नावाच्या अर्धापूर येथील तरुणाने हा मेल पाठवला असल्याची माहिती नांदेड गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं माहिती घेऊन सदर आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रउफला जेरबंद करत त्याच्या विरुध्द वाजीराबाद पोलिसांत भारतीय दंड संहितेसह आणि सायबर क्राईम अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अचनाक आलेल्या या धमकीच्या ई मेलमुळे सर्वत्र भितीचं वातावरण पसरलं होतं. या आरोपीनं असं का केलं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget