एक्स्प्लोर
पैसे बदलण्यासाठी बँकेत आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू
![पैसे बदलण्यासाठी बँकेत आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू Nanded 70 Years Old Man Died In Queue Outside Of Bank Due To Heart Attack पैसे बदलण्यासाठी बँकेत आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/16105126/Nanded_Death.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. दिगंबर मारीबा कसबे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 70 वर्षांचे होते.
मूळचे बळीरामपूरचे असलेले दिगंबर कसबे तुप्पा इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे बदलण्यासाठी आले होते. मात्र बँकेबाहेर रांगेत उभे असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. रांगेतील लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने दिगंबर कसबे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल.
नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाचा बँकेबाहेरच्या रांगेतच मृत्यू
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर, पैसे बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे. नोटा जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी पहाटेपासूनच बँकांबाहेर लोक रांगा लावत आहेत. दरम्यान, मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वीच बँकेत पैसे बदलण्यासाठी आलेल्या 73 वर्षीय विश्वनाथ वर्तक या वृद्धाचा रांगेतच मृत्यू झाला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)