एक्स्प्लोर

Nana Patole : महाराष्ट्रात दूधाचा दर सर्वात कमी, अमूलच्या फायद्यासाठी सरकारकडून दूध भुकटीची आयात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : राज्यातले आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी असून सरकारने दूधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय केवळ अमूलच्या फायद्यासाठी घेतलाय, असा आरोप नाना पटोले यांनी सरकारवर केलाय.  

मुंबईराज्यातले आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. सरकारने दूधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलाय.  दूध उत्पादक शेतकऱ्यांना  लाभ होऊ नये याची काळजी हे सरकार घेत आहे. राज्यात देखील शेतकरी विरोधी लोक सत्तेत बसले आहेत. या निर्णयामुळे अमूलला कसा फायदा मिळेल याकडेच त्यांचे लक्ष आहे. दूधाचा दर महाराष्ट्रातच सर्वात कमी आहे. मात्र याच कंपन्या शेतकर्‍यांकडून कमी दरात दूध विकत घेतात आणि 45-50 रुपये प्रति लिटरनं ते दूध विक्री करून अधिक नफा मिळवता. त्यामुळे सरकारचे अद्याप शेतकरी विरोधी धोरण कायम असल्याचा घणाघात  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर केला आहे.  

केवळ अमूलच्या फायद्यासाठी दूध भुकटीची आयात- नाना पटोले

राज्यात दूधाचा दर सर्वात कमी आहे. असे असताना केवळ अमूलच्या फायद्यासाठी सरकारकडून दूध भुकटीची आयात केली जात आहे. याचा आम्हाला विरोध असून दूधाचे दर कमी जास्त करणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. आज अमूल सारख्या कंपन्या शेतकर्‍यांचे नुकसान करत आहे, त्यावर कोणीही बोलत नाही. राज्यातले हे सरकार गुजरात धार्जिणे आहे. शेतकऱ्यांना प्रति लीटर 40 रुपये दर मिळावा, ही आमची मागणी ही  नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारकडे केली आहे.

मविआत हिटलरशाही नाही, प्रत्येकाला अधिकार

लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. त्या अनुषंगाने महाविकस आघाडी आणि महायुती कडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच मविआतील जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल, याबाब शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले की, आमचं लक्ष एकच आहे की, अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसा आमचं उद्याची महाराष्ट्राची निवडणूक आहे. विधानसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र लढणार आहे. जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल. तीन महिने हातामध्ये आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तर या बाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि,  मविआत हिटलरशाही नाही. मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही सर्व मविआतील नेते सोबत बसू तेव्हा एकत्र जनतेसमोर आमची भूमिकाही स्पष्ट करू, असेही ते म्हणाले आहेत.  

इतिहासात जनतेची दिशाभूल करणारा पहिला बजेट

पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी वीज बिल फ्री दिलं जाईल असं सांगितलं होतं. राज्याला आपल्या खांद्यावर भार घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. लाडली बहिण याचा जीआर काढला आहे, मात्र त्याचा बुर्खा आपण उद्यापासून फाडू. यासंदर्भात हक्कभंग देखील मुख्यमंत्र्यांवर टाकला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जीआर काढला आणि घोषित केलं. मात्र आमचं म्हणणं आहे दीड हजारांनी नाही चालणार, साडे आठ हजार रुपये मिळाले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे मत नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केलंय.   

या योजनेत किती महिलांना लाभ मिळणार आहे आणि किती अटी आहेत? द्यायचे आहे तर प्रामाणिक पणे द्या. राज्यातल्या तिजोरीतले पैसे असे जात असतील तर आम्हाला आनंदच आहे. सरसकट बहीणींना फायदा झाला पाहिजे, ही आमची मागणी होती. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही खटाखट खटाखट पैसे टाकले असते. हल्लीचा राज्यातील बजेट म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात जनतेची दिशाभूल करणारा पहिला बजेट असेल. हे राज्यातल्या जनतेचं नव्हे तर थातुरमातूर बजेट आहे. शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांसाठी यांना काही करायची गरज नाही. असा घणाघातही नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Embed widget