Anil Deshmukh Case : ED च्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचं नावच नाही; अद्याप चौकशी झाली नसल्याचं कारण
अनिल देशमुखांच्या विरोधात 100 कोटींच्या वसुली प्रकरणी (Anil Deshmukh Case) ईडीने (ED) कारवाई सुरु केली. पण ईडीच्या आरोपपत्रात खुद्द अनिल देशमुखांचेच नाव नसल्याचं समोर येत आहे.
मुंबई : अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचचं नाव नसल्याची माहिती समोर येतेय. अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचं कारण ईडीचे अधिकारी याबाबत खाजगीत बोलताना देत आहेत. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.
इडीच्या आरोपपत्रात सचिन वाझेसह 14 जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. ज्यात अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.
देशमुखांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली आहे.
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
संबंधित बातम्या :