एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कट्टर हिंदूत्त्ववाद आणि पुन्हा मराठवाडा कनेक्शन
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी औरंगाबादमधील केसापुरीतून शरद कळसकरला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून समोर आलं ते डॉ. दाभोलकरांच्या हत्येचं कनेक्शन...
औरंगाबाद : गेल्या काही दशकांपासून सीमी, आयसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांची पाळंमुळं संतांची भूमी अशी ओळख असलेल्या मराठवाड्यापर्यंत पोहोचली. आता कट्टर हिंदूत्त्व मनात भरलेल्या तरुणांच्या हाती एक विचार संपवण्यासाठी बंदुका दिल्याचं समोर आलं आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादपासून काही किमी अंतरावरील केसापुरी गावच्या शरद कळसकरला नालासोपाऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात अटक झाली आणि 25 घरांचं खेडं असलेलं केसापुरी गाव महाराष्ट्रात चर्चेत आलं.
त्यापाठोपाठच औरंगाबादच्या जुन्या शहरातून शरदचा मित्र सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. याच प्रकरणात जालन्यातून श्रीकांत पांगारकर याला एटीएसने बेड्या ठोकल्या आणि पूर्वी सीमी, आयसिसच्या दहशतवादाचं स्लीपर सेल असलेलं मराठवाडा दहशतीच्या माध्यमातून एटीएस, सीबीआयच्या रडारवर आलं.
एटीएसने पकडलेल्या शरद कळसकरचा मित्र सचिन अंदुरे यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. दाभोलकरांचा विचार संपवणारे मारेकरी देखील मराठवाड्यातलेच निघावेत हे दुर्दैव असल्याची खंत विचारवंत व्यक्त करतात.
यापूर्वीही मराठवाड्यातल्या काही हिंदूत्त्ववादी संघटनांवर दहशतवादाचे आरोप झाले. नोव्हेंबर 2002 ला औरंगाबाद शहरातील निराला बाजारमध्ये पाईप बॉम्ब ब्लास्ट झाला, तर खडकेश्वर भागात एक जिवंत बॉम्ब आढळला. यामागेही काही कट्टर हिंदूत्त्ववादी संघटना असल्याचं बोललं गेलं.
2006 ला नांदेड शहरामध्ये बॉम्ब बनवताना ब्लास्ट झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यामागेही काही हिंदूत्त्ववादी संघटना असल्याचा दावा पोलीस यंत्रणेने केला होता. याची पाळेमुळे देखील उद्ध्वस्त केली गेली. त्यानंतर आता दाभोलकरांच्या हत्येमागे पुन्हा एकदा मराठवाडा कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या :
नालासोपारा स्फोटकांसाठी श्रीकांत पांगारकरची आर्थिक मदत : ATS
अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement