एक्स्प्लोर
नागपुरात व्यापारी मारहाण प्रकरणानंतर बाजार बंद

नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी भागात व्यापारी पिता-पुत्रावर झालेल्या हल्ल्याविरोधात आज व्यापारांनी कडकडीत बंद पाळला आहे. व्यापाऱ्यांनी अर्धा दिवस आपली दुकानं बंद करुन पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात आपला निषेध नोंदवला. दोन दिवसांपूर्वी प्रसन्न मोदी या व्यापाऱ्यावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी आपल्या वडिलांना वाचवायला गेलेल्या निशांकलाही गुंडांनी जोरदार मारहाण केली. पण नागपूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारे या गुंडाविरोधात कारवाई केली नाही. मारहाणीत जखमी झालेल्या प्रसन्न मोदींवर अद्यापही मानसिक ताण आहे. त्यामुळे आता तरी पोलिस या गुंडांविरोधात काही कारवाई करणार का हे पहावं लागणार आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















