एक्स्प्लोर

kirit somaiya : डिक्शनरीत जेवढ्या शिव्या आहेत तेवढ्या एकदाच देऊन टाका, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार 

छगन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती पाहण्यासाठी गेलो होतो, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचे सोमय्या म्हणाले.

kirit somaiya : माझ्याबरोबर सुमारे 20 ते 25 लोकांवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी आमची भूमिका मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी एफआयर आमच्या हातात दिली. ती एफआयर  म्हणजे हास्यास्पद बाब असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले. छगन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती पाहण्यासाठी गेलो होतो, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल झाला असल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच मला देऊन टाका रोज माझ्या आईला संताप नको असे म्हणत सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

बेनामी प्रॉपर्टीची पाहणी करणे हा गुन्हा आहे का?

भुजबळांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला की, मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की,  किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकणार, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला हे समजत नसल्याचे सोमय्या म्हणाले. बेनामी प्रॉपर्टीची पाहणी करणे हा गुन्हा आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला. कोवीड सेंटरमध्ये घोटाळा करणारे संजय राऊत, त्यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. जे हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पण 100 कोटींची प्राॉपर्टी मीडियाला, जगाला दाखवली म्हणून आमच्यावर कोरोना नियमांचा दुरुपयोग करुन गुन्हा दाखल करण्यात येतो, हे आमचं दुर्दैव असल्याचे सोमय्या म्हणाले. 

महाराष्ट्र घोटाळामुक्त करुन दाखवणार 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लुटणार आणि किरीट सोमय्या गप्प राहणार का? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकदा काय हजारवेळा मला जेलमध्ये टाकले तरी महाराष्ट्र घोटाळामुक्त करुन दाखवणार असेही सोमय्य यावेळी म्हणाले. मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच देऊन टाका रोज माझ्या आईला संताप नको असे सोमय्या यावेळी म्हणाले.
 
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमान्वये सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण सत्य असे आहे की, ते संपत्ती बघायला एकटे आले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही बाजूला पोलीस होते. हे पूर्ण राजकीय षडयंत्र असल्याची माहिती सोमय्या यांचे वकिल दिनानाथ तिवारी यांनी दिली. नोटीस पाठवली आहे. त्यांनी एफआयआर दाखल केला आहे, पण चार्जशीट अजून दाखल जाली नाही. कलम 188, सेक्शन 11, 41बी आणि इतर कलमं लावली असल्याची माहिती दिनानाथ तिवारी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget