एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

माझा इम्पॅक्ट : फुकटात पोहे खाणाऱ्या पोलिसाची चौकशी

नागपूर : फुकट पोहे खाऊन ठेलेवाल्याकडूनच 9 हजार रुपये वसूल करणाऱ्या पोलिसाचा पर्दाफाश 'एबीपी माझा'ने केल्यानंतर, आता पोलीस खात्याला जाग आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे.   वरिष्ठ अधिकारी रवींद्र सिंह यांनी स्वत: रात्री उशिरापर्यंत सीताबर्डी पोलीस स्थानकात धाव घेऊन चौकशी केली. त्यांनी पीडित मुलाला बोलावून घेऊन, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं.   याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.   दरम्यान पोलिसांनी पैसे उकळल्याप्रकरणी पीडित मुलाने तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही.   काय आहे प्रकरण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 15 दिवसांपूर्वी तुली इंटरनॅशनल परिसरात कार्यक्रम होता. त्यासाठी पोलीस रामदास पेठ परिसरात बंदोबस्ताला होते. बराच उशीर झाल्यानं त्यांना भूक लागली आणि त्यांनी ठेला गाठला. एका मुलाच्या ठेल्यावर पोहे आणि चहाचा नाश्ता केल्यावर बिल झालं 105 रुपये. ते या मुलानं वसूलही केलं, पण त्याची शिक्षा त्याला रविवारी मिळाली. रविवारी मुलाला पोलिसांनी पकडून नेलं. हे ऐकताच त्याचे काका घाबरले. त्यांनी पोलीस ठाणं गाठलं, तर फुकट्या पोलिसांचा पारा चढलेला. फक्त पोह्याचे 105 रुपये घेतले, म्हणून सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून 9 हजार रुपये वसूल केले. या मुलाची परिस्थिती गरीबीची आहे. घरात खाणारी तोंडं जास्त. त्यामुळे दिवसभर पोह्याचा ठेला चालवायचा, आणि रात्रशाळेत शिकायचं, असा त्याचा दिनक्रम. एवढे कष्ट करुन त्याच्या नशीबी आली ती पोलिसांची मुजोरी. पोलिसांनी अडल्या-नडलेल्यांना मदत करणं अपेक्षित आहे, इथं पोलीस फुकटेगिरीत, हप्तेखोरीत आणि खंडणीखोरीत दंग आहेत. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये, असं वाटत असेल तर सीताबर्डी पोलिसांवर खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.   एबीपी माझा ने काल संध्याकाळी ही बातमी प्रसारित केल्यानंतर, पोलीस अधिकारी कामाला  लागले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावनाEknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदेEknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदेEknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
Embed widget