एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur News : राज्याच्या गृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात रस्त्यावर चिअर्स; दिवसा ढवळ्या खुलेआम भरतोय बार

Nagpur News : राज्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'चे प्रकार वाढले असताना आता दक्षिण-पश्चिम नागपूर म्हणजेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nagpur News नागपूर : राज्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'चे प्रकार वाढले असताना आता दक्षिण-पश्चिम नागपूर म्हणजेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरातील सरस्वती विहार कॉलनी आणि गजानन नगर परिसरात रस्त्यावरच बार भरतो की काय, असा प्रश्न उपस्थित निर्माण करणारे चित्र समोर आले आहे.

इथे मद्यपी जवळच असलेल्या दारू दुकानातून दारु आणि पाण्याच्या बॉटल खरेदी करून दिवसाढवळ्या झाडाच्या खाली चिअर्स करताना आढळून आले आहे. हा संपूर्ण प्रकार येथे राहणाऱ्या एका स्थानिकाने आपल्या कॅमेरात कैद केला असून हे नेहमीचेच चित्र असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकारांमुळे स्थानिक मात्र प्रचंड त्रासले असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.  

महिलांचे, लहान मुलांचे घराबाहेर निघणे झाले अवघड

राज्याची उपराजधानी नागपूर हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे. असे असताना मधल्या काळात सातत्याने घडलेल्या ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह अपघताच्या घटना आणि गुन्हेगारीने शहर हादरले आहे. अशातच आता तळीरामांना रस्ते हे जणू काही ओपन बारच झाले आहे का? असा सवाल उपस्थित करणार प्रकार समोर आला आहे. नागपूर शहरातील सरस्वती विहार कॉलनी आणि गजानन नगर परिसरात रस्त्यावरच काही लोक दिवसा-ढवळ्या दारू पित असल्याची तक्रार नागरिकांची आहे. जवळच्या दुकानातून दारू विकत घेऊन मिळेल तिथे हे मद्यपी रस्त्यावरच चिअर्स करत आहेत.

परिणामी त्यांना कुणाचाच धाक उरला नाहीये का? असा प्रश्न देखील नागरिक विचारात आहे. तर येथे त्यांना पोलिसांचा आशीर्वाद असल्यानेच हे सर्व सुरु असल्याची चर्चा आहे. या परिसरात दारुड्यांसाठी रस्ते म्हणजे ओपन बार झालेले आहे. या सर्व प्रकाराला वेळीच निर्बंध न लावल्यास परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता या प्रकरणी काही कारवाई होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उपराजधानीत चाललंय तरी काय?

 नुकताच एका धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतानाचा (Video Viral) एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यानंतर लगेचच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला, ज्यामध्ये चालत्या दुचाकीवर प्रेयसीसोबत अश्लील कृत्य (Nagpur News) करणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा तो व्हिडीओ समाजमध्यमांवर व्हायरल झाला होता. हे प्रकरण ताजे असताना यात अधिक भर घालणार आणखी एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

दारूच्या नशेमध्ये (Drunk Couple) चूर असलेला तरुण तरुणीला उचलून नेताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र प्रियकर आपल्या प्रेयसीला उचलून नेत असताना त्याचा तोल जाऊन तोही जमिनीवर आदळतो, असं या व्हायरल व्हिडीओ  मध्ये दिसत आहे. नागपुरातील बजाज नगर पोलीस स्टेशनला हद्दीतील हा व्हिडीओ आहे. त्यामुळे सातत्याने समोर येणारे प्रकार बघता राज्याच्या उपराजधानी नागपुरात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल आता नागपूरकर विचारू लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Bhiwandi News : महामार्गावरील दुरावस्थेमुळे नागरिकांचा संताप; भिवंडीत खड्ड्यामुळे चक्क ट्रक पलटला; वाहतूकसेवा विस्कळीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget