एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नागपुरात नक्षलवादविरोधी पथकाची 10 एकर जमीन उद्योजकाने लाटली

अत्यंत संवेदनशील आणि मौल्यवान 10 एकर जमिन चक्क पोलिसांनीच हडपल्याचा दावा केला जात आहे.

नागपूर : एकीकडे सर्वसामान्य माणूस जमिनीचे वाद मिटवण्यासाठी किंवा आपली जमीन कुणी हडपली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी पोलिसांकडे जातो. मात्र पोलिसांचीच जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असेल तर? नागपुरात असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. नक्षलवादविरोधी पथक प्रशिक्षण केंद्रावर नागपूर पोलिसांनी डल्ला मारल्याचा आरोप होत आहे. अत्यंत संवेदनशील आणि मौल्यवान 10 एकर जमिन चक्क पोलिसांनीच हडपल्याचा दावा केला जात आहे. मोठ्या पाठपुराव्यानंतर खाजगी उद्योजकासह 6 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या सूराबर्डीत महाराष्ट्र पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान प्रशिक्षण केंद्र आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला खाजगी उद्योजक ब्रिजकिशोर अग्रवालचं आलिशान क्लब हाऊस आहे. याच क्लब हाऊसच्या नावाखाली अग्रवालने प्रशिक्षण केंद्राची 10 एकर जमीन हडपल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यात महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांचाही हात असल्याची माहिती आहे. 2008 पासून जमीन हडपण्याचं हे कट-कारस्थान सुरु होतं. जानेवारी 2010 मध्ये तत्कालीन तलाठ्याच्या मदतीनं अग्रवालने सातबारावर नाव आणलं. नक्षलविरोधी प्रशिक्षण केंद्राच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करत महसूल अधिकाऱ्यांनी 2010 मध्ये जमिनीचा फेरफार अग्रवालच्या नावावर करुन दिला. यानंतर अत्यंत संवेदनशील 10 एकर जमीन कागदोपत्री अग्रवाल यांच्या नावावर झाली. अखेर मोठ्या पाठपुराव्यानंतर अग्रवालसह 6 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी अजून कुणालाही अटक झालेली नाही. गरजेप्रमाणे कारवाईची भाषा पोलिस बोलू लागले आहेत. मात्र इतके दिवस पोलिस खात्यानं डोळ्यावर कातडं ओढलं होतं का? अशा अनेक प्रश्नांना पोलिसांना उत्तर देणं भाग पडणार आहे. इतकी संवेदनशील जमिनही अशाप्रकारे अधिकाऱ्याच्या प्राभावाखाली लाटली जात असेल तर तुमच्या-आमच्या जमिनींची गत न विचारलेलीच बरी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget