एक्स्प्लोर

लिंगबदल करुन बारबाला बनण्याचं स्वप्न, भाच्याचा मावशीच्या सोन्यावर डल्ला

त्यामुळे आपणही जर मुलगी झालो आणि बारबाला बनलो तर या माध्यमातून बक्कळ पैसा मिळवू शकतो, असा विचार त्याच्या मनात नेहमीच यायचा. शिवाय तो मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त रामायचा. त्याला मुलींसारखे नटायला आवडायचं.

नागपूर : लिंगबदल करुन बारबाला बनण्यासाठी नागपुरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने मावशी आणि तिच्या मैत्रिणीच्या तब्बल 52 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक म्हणजे मावशीला मुंबईत डान्सबारमध्ये काम करुन मिळणारा पैसा पाहून, त्याला आपण लिंग बदलून मुलगी बनावं आणि डान्सबारमध्ये काम करावं असा विचार आला होता. आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाची मावशी डान्सबारमध्ये काम करुन मोठी कमाई करत असे. सुट्ट्यांमध्ये मुंबईत गेल्यावर मावशीचं राहणीमान, तिची ऐश आणि तिला मिळणारा पैसा पाहून तो भारावून गेला होता. त्यामुळे आपणही जर मुलगी झालो आणि बारबाला बनलो तर या माध्यमातून बक्कळ पैसा मिळवू शकतो, असा विचार त्याच्या मनात नेहमीच यायचा. शिवाय तो मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त रामायचा. त्याला मुलींसारखे नटायला आवडायचं. निसर्गाने ज्याला मुलगा म्हणून घडवलं होतं, त्याची मुलगी बनण्यासाठीची उत्कट इच्छा घराजवळच राहणाऱ्या आणि खास मैत्रीण असलेल्या 19 वर्षीय रेहानाने हेरली. या मुलाला मुलगी बनवण्याचं स्वप्न दाखवून लुबाडता येईल, असं तिला वाटलं. त्यामुळे रेहानाने त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तुला मुलगी बनता येईल, मात्र त्यासाठी डॉक्टर भरपूर पैसे घेईल, आपल्याकडे पैसे आले तर तुझे स्वप्न पूर्ण होईल, असं तिने सांगितलं. लिंगबदल करुन बारबाला बनण्याचं स्वप्न, भाच्याचा मावशीच्या सोन्यावर डल्ला बार डान्सर असलेल्या मावशीला तिचे आणि आणखी एका मैत्रिणीचे 52 तोळे दागिने मुंबईच्या लॉकरमध्ये ठेवण्यात अडचणी येत असल्याने, ती 6 ऑगस्ट 2018 रोजी नागपुरात आली. नागपुरच्या बँकेत दागिने ठेवण्यासाठी मॅनेजरने तिला 8 ऑगस्टला बोलावलं होतं. मात्र त्याआधीच मुलाने घरातील कपाटात ठेवलेले दागिने घेतले आणि थेट रेहानाकडे पोहोचला. रेहानाने इम्रान आणि फारुख नावाच्या मित्रांच्या मदतीने मुलाला आठ दिवस नागपूरच्या पारडी भागातील एका घरात ठेवलं. या काळात रेहानाने मुंबईतील कोपरखैराणेमधील सेक्टर 19 मधील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला आणि त्यानंतर मुलाला घेऊन मुंबईला रवाना झाले. इकडे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलगा बेपत्ता झाल्याचे आणि घरी 52 तोळे दागिने चोरी झाल्याची तक्रार लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी अनेक दिवस शोध घेतला, मात्र त्याचा काही पत्ता लागत नव्हता. तर कोपणखैरणेमध्ये रेहाना आणि तिचे साथीदार मुलाला लवकरच तुझं लिंगबदल उपचार सुरु करु, अशा थापा मारत चोरलेले सोनं विकून मौजमजा करत होते. मग पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरु लागली. सतरंजीपुरा भागातून इम्रान आणि फारुख हे तरुण अनेक दिवस मुंबईत आहेत. त्यांचं राहणीमान अचानकच बदलल्या पोलिसांना कळलं. संशय बळावल्याने त्यांचा शोध सुरु झाला आणि पूर्ण टोळी मुंबईत असल्याचं पोलिसांना कळलं. यानंतर पोलिसांनी कोपरखैरणेमधून सगळ्यांना अटक केली. विशेष म्हणजे या काळात मुलाचं लिंगबदल तर झालं नाहीच, मात्र या कालावधीत रेहाना, इम्रान आणि फारुखच्या अय्याशीत 52 तोळ्यांचे दागिने 16 तोळ्यांवर आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget