एक्स्प्लोर
खड्ड्यामुळे दुचाकी पडून चिमुरड्याचा मृत्यू, आई-बहीण जखमी
12 वर्षांचा रितेश मसराम आई वनिता आणि 9 वर्षांच्या बहिणीसोबत दुचाकीवरुन शाळेतून घरी येत होता. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची टूव्हीलर उसळली आणि त्यामुळे आईचा बॅलेन्स गेला.
![खड्ड्यामुळे दुचाकी पडून चिमुरड्याचा मृत्यू, आई-बहीण जखमी Nagpur 12 Year Old Boy Dies As Two Wheeler Gets Imbalance Due To Potholes Latest Update खड्ड्यामुळे दुचाकी पडून चिमुरड्याचा मृत्यू, आई-बहीण जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/09221647/nagpur-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : टूव्हीलर खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुचाकीवर त्याच्यासोबत असलेली आई आणि बहीण जखमी झाल्या आहेत.
नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. 12 वर्षांचा रितेश मसराम आई वनिता आणि 9 वर्षांच्या बहिणीसोबत दुचाकीवरुन शाळेतून घरी येत होता. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची टूव्हीलर उसळली आणि त्यामुळे आईचा बॅलेन्स गेला.
दुचाकीसोबत आई आणि बहीण एका बाजूला पडल्या, तर रितेश रस्त्यावर दुसऱ्या दिशेला पडला. दुर्दैवाने त्यांच्या
दुचाकीमागून येणाऱ्या एका खासगी बसखाली रितेश चिरडला गेला. त्यामुळे त्याचा जागीच अंत झाला.
महिलांना बळ देणाऱ्या लेडी रायडरचा खड्ड्यामुळे करुण अंत
अवघ्या काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये मुंबईतील लेडी बायकरचा अशाचप्रकारे मृत्यू ओढवला होता. खड्ड्यात आपटून बाईक पडल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून जागृती होगाळेंना प्राण गमवावे लागले होते. सातत्याने खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांनंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)