एक्स्प्लोर
31 नगरपालिकांवर सत्ता, भाजपची मोठी झेप
मुंबई :राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी भाजपने मुसंडी मारल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला आहे. 52 नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत.
तर 20 नगरपालिका जिंकत काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
या निवडणुकांत सर्वात जास्त नुकसान राष्ट्रवादीचं झालं आहेत. राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे.
मात्र शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांच्या संख्येच्या बाबतीत भाजपनंतर शिवसेनेचा क्रमांक येतो.
विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही चांगलं यश मिळालं आहे. कारण 25 नगरपालिकांवर आघाडीची सद्दी असणार आहे. तर त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल 34 आहे.
------------------------
रायगड : खोपोली : शिवसेना 10, राष्ट्रवादी 10, शेकाप 3, भाजप 3, काँग्रेस 2, अपक्ष 1 जागेवर विजयी, राष्ट्रवादीच्या सुमन औसरमल नगराध्यपदी
रायगड : पेण : काँग्रेस 11, शेकाप नगरविकास आघाडी 10 जागांवर विजयी, काँग्रेसचे प्रितम पाटील नगराध्यक्ष
हिंगोली : कळमनुरी : शिवसेना 9, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 जागांवर विजयी, शिवसेनेचे उत्तमराव शिंदे नगराध्यक्षपदी
अमरावती : अचलपूर : काँग्रेस 7, भाजप 7, शिवसेना 2, प्रहार 8, रिपाइं 1, राष्ट्रवादी 3, इतर 10 जागांवर विजयी, शिवसेनेच्या सुनिता थिस्के नगराध्यक्षपदी
बुलडाणा : शेगाव : भाजप 14, महायुती 6, शिवसेना 4, एमआयएम 2 जागेवर विजयी, भाजपच्या शकुंतला बुच भेजा नगराध्यक्षपदी
यवतमाळ : उमरखेड : भाजपा 7, शिवसेना 4, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 1, एमआयएम 8, अपक्ष 1 जागेवर विजयी, भाजपचे नामदेव ससाणे नगराध्यक्ष
हिंगोली : वसमत : राष्ट्रवादी 8, काँग्रेस 6, शिवसेना 6, भाजप 7, अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे श्रीनिवास पोरजकर नगराध्यक्ष
वाशिम : कारंजा : भारिपचे प्रकाश ढोके नगराध्यक्षपदी
वाशिम : मंगरुळपीर नगरपालिका भारिपच्या ताब्यात, भारिपचे डॉ. गजाला खान नगराध्यक्षपदी
वर्धा : भाजप 27, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 5, माकपचा 1 जागेवर विजयी, भाजपचे अतुल तराळे नगराध्यक्ष
जळगाव : धरणगाव : शिवसेना 14, भाजप 6 जागांवर विजयी, शिवसेनेचे सलीम पटेल नगराध्यक्ष
वर्धा : देवळी : भाजप 11, काँग्रेस 6 जागांवर विजयी, भाजपच्या सुचिता मडावी विजयी
परळी वैजनाथ : राष्ट्रवादी 27, भाजप 4, शिवसेन 1, काँग्रेसचा 1 जागांवर विजय, राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे नगराध्यक्षपदी
यवतमाळ : आर्णीमध्ये त्रिशंकू परिस्थिती : राष्ट्रवादी 8, काँग्रेस 7, शिवसेनेला 4 जागा, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अर्चना मंगाम
सोलापूर : बार्शी : राष्ट्रवादी 11, शिवसेना 29 जागांवर विजयी, शिवसेनेचे आसिफ तांबोळी नगराध्यक्ष
नाशिक : येवला : राष्ट्रवादी 10, भाजप 4, शिवसेना 5, अपक्ष 5 जागांवर विजयी, राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत नाही
सांगली : तासगाव : भाजप 13, राष्ट्रवादी 8, भाजपचे विजय सावंत नगराध्यक्ष
चंद्रपूर : राजुरा : काँग्रेस 9, बीजेपी 3, शेतकरी संघटना 4, वि वि आघाडी 1, अपक्षांचा 1 जागेवर विजय, नगराध्यक्ष अरुण धोटे
रत्नागिरी : राष्ट्रवादी 5, शिवसेना 17, भाजप 6 आणि अपक्ष 2 जागांवर विजयी, शिवसेनेचे राहुल पंडीत नगराध्यक्ष
सातारा : उदयनराजे सातारा विकास आघाडी 22, शिवेंद्रराजे नगरविकास आघाडीला 12 जागा
सोलापूर : मंगळवेढा : काँग्रेस-राष्ट्रवादी 11, भाजप 1 आणि शिवसेनेला 1 जागा, राष्ट्रवादीच्या अरुणा माळी नगराध्यक्षा
अहमदनगर : राहाता : काँग्रेस 6, राष्ट्रवादी 1, शिवसेना 2, भाजपा 7, अपक्षांना 1 जागा, भाजपच्या ममता पिपाडा नगराध्यक्षा
जळगाव : बोदवड : भाजप 7, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 2, शिवसेना 1, अपक्ष 3 जागांवर विजयी
यवतमाळ - दारव्हा : शिवसेना 8, काँग्रेस 4, भाजप 4, सपा 2, अपक्ष 2 जागांवर विजयी
परभणी : पाथरी 20 पैकी 20 जागा राष्ट्रवादीला, मीना भोरे नगराध्यक्षा
सांगली : खानापूर : जि प सदस्य सुहास शिंदे गटाच्या खानापूर विकास आघाडीला 7 जागा, राजेंद्र माने गटाला 5 जागा, आमदार अनिल बाबर पुरस्कृत जनता विकास आघाडीला 5 जागा
रायगड : महाड : काँग्रेस 12, शिवसेना 5 जागावंर विजयी, काँग्रेसच्या स्नेहल जगताप नगराध्यक्ष
नाशिक : नांदगांव : शिवसेना 11, राष्ट्रवादी 4 काँग्रेस 2 जागांवर विजयी, राजेश कवडे नगराध्यक्ष
रायगड : रोहा : राष्ट्रवादी 11, शिवसेना 1, अपक्ष 2 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे नगराध्यक्ष
सोलापूर : दुधनी : 15 जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत, मात्र दोन जागा असलेल्या भाजपकडे नगराध्यक्षपद
जालना : परतूर : बबनराव लोणीकरांना धक्का, पत्नी मंदाताई लोणीकर यांचा पराभव, काँग्रेसच्या विमल जेथलिया विजयी
नाशिक : सिन्नर : शिवसेना 17, भाजप 10, अपक्षांना 1 जागा, शिवसेनेचे किरण डगळे नगराध्यक्ष
रायगड : रोहा : राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे विजयी, बंडखोर संदीप तटकरेंचा पराभव
सोलापूर : अक्कलकोट : भाजप 23, काँग्रेस 7 जागांवर विजयी, भाजपच्या शोभा खेडगी नगराध्यक्षपदी
सातारा : वाई : राष्ट्रवादी 14, काँग्रेस 6 जागांवर विजयी, नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे
सातारा : महाबळेश्वर : राष्ट्रवादी प्रणित स्थानिक आघाडी 11, शिवसेना स्थानिक आघाडी 6 जागांवर विजयी
सिंधुदुर्ग : वेंगुर्ला : काँग्रेस, 7, भाजप 6, राष्ट्रवादी, 1, शिवसेना 1, अपक्षांना 2 जागा, भाजपचे राजन गिराप नगराध्यक्षपदी
चंद्रपूर : मूल : भाजप 16 आणि काँग्रेस 1 जागेवर विजयी
परभणी : सोनपेठ : काँग्रेस 12, राष्ट्रवादी 5 जागांवर विजयी, काँग्रेसच्या जिजाबाई राठोड नगराध्यक्षपदी
अमरावती : दर्यापूर : भाजप 6, काँग्रेस 11, मनसे 2, अपक्षांना 1 जागा, नगराध्यक्षपदी भाजपच्या नलिनी प्रकाश भारसाखळे
अहमदनगर : श्रीरामपूर : काँग्रेस 22, महाआघाडीला 10 जागा, मात्र नगराध्यक्षपद महायुतीच्या अनुराधा आदिक विजयी
बीड : एमआयएमचे दोन उमेदवार विजयी
अकोला : बाळापूर : काँग्रेस 16, परिवर्तन आघाडी 7 जागांवर विजयी, काँग्रेसचे ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब नगराध्यक्ष
वर्धा : आर्वी : 23 पैकी 23 जागा भाजपला, नगराध्यक्षपदही भाजपकडे
जळगाव : पारोळा : भाजप 7, शहर विकास आघाडी 7, शिवसेना 5, अपक्ष 2 जागांवर विजयी, भाजपचे करन पवार नगराध्यक्ष
रायगड : रोहा : राष्ट्रवादी 13, शिवसेना 1, अपक्ष 3 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडो नगराध्यक्षपदी
सांगली : इस्लामपूर : राष्ट्रवादी 14, विकास आघाडी 13, अपक्ष 1 जागांवर विजयी, विकास आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष
सिंधुदुर्ग : मालवणमध्ये राणेंना धक्का : काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 5, शिवसेना 5, अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे महेश कांदळगावकर नगराध्यक्ष
नंदुरबार : शहादा : काँग्रेस 11, एमआयएम 4, भाजप 10, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 जागेवर विजयी, भाजपचे मोतीलाल फकिरा पाटील नगराध्यक्षपदी
चिपळूण : शिवसेना 10, भाजपा 5, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 4, अपक्षांना 2 जागा, भाजपच्या सुरेखा खेराडे नगराध्यक्ष
अकोला : मुर्तिजापूर : भाजप 7, शिवसेना 4, भारिप-बमसं 04, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5, अपक्ष 2 जागांवर विजयी
जळगाव : रावेर : शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 7, जनक्रांती आघाडीला 5 जागा, जनक्रांती आघाडीचे दारा मोहम्मद नगराध्यक्ष
अकोला : पातूर : भाजप 3, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 9 जागांवर विजयी
धुळे : दोंडाई : भाजप 20, काँग्रेस 03, मनसेला 1 जागा, भाजपच्या नयन कुंवर रावल नगराध्यक्ष
रायगड : माथेरान : शिवसेना 14, राष्ट्रवादी 2, काँग्रेसला 1 जागा, शिवसेनेच्या प्रेरणा सावंत नगराध्यक्ष
सोलापूर : सांगोला : शेकाप आघाडी 11, महायुती 5 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, महायुतीच्या राणी माने नगराध्यक्षा
जालना : भोकरदन : रावसाहेब दानवेंना धक्का, भाजप 4, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 4 जागांवर
रत्नागिरी : खेड : शिवसेना 10, आघाडीला 7 जागा, नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर
कोल्हापूर : कागल : राष्ट्रवादी 12 आणि भाजप 8 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे माणिक माळी नगराध्यक्ष
धुळे : शिरपूर : काँग्रेस 21, भाजप 4, अपक्ष 5, काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल नगराध्यक्ष
सातारा : कराड : काँग्रेस 16, राष्ट्रवादी 6, भाजप 4 आणि इतरांना 3 जागा, भाजपच्या रोहिणी शिंदे नगराध्यक्ष
नाशिक : मनमाड : शिवसेना 19 , राष्ट्रवादी 4, काँग्रेस 4, रिपाइं 2 आणि अपक्ष 1 जागांवर विजयी, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या पद्मावती धात्रक आघाडीवर
रायगड : श्रीवर्धन : शिवसेने नरेंद्र भुसाणे नगराध्यक्ष, राष्ट्रवादीला 13, शिवसेनेला 4 जागा
नंदुरबार : शहादा : काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि भाजपला 2 जागा
शिर्डी : विखे पाटलांनी गड राखला, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, अपक्ष 2, भाजप 3, मनसे 1 शिवसेनेला 1 जागा 7
रायगड : मुरुड : काँग्रेस आघाडी 6, शिवसेना 9, शिवसेनेच्या स्नेहा पाटील नगराध्यक्षपदी
नाशिक : सिन्नर : नगरपालिका : शिवसेना 17, भाजपा 10 आणि आणि अपक्ष 1 जागेवर आघाडीवर, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे किरण डगळे आघाडीवर
सांगली: आष्टा : शहर विकास आघाडी 15, अपक्ष 3, लोकशाही आघाडी 3 जागांवर विजयी
सोलापूर : कुर्डुवाडी : 17 जागांपैकी, स्वाभिमानी 8, शिवसेना 9, अपक्षांना 1 जागा, समीर मुलाणी नगराध्यक्ष
सातारा : पाटण : राष्ट्रवादी 13, शिवसेना 2, भाजप 1 आणि इतरांना 1 जागा
उस्मानाबाद : तुळजापूर : 20 पैकी 14 जागा राष्ट्रवादीला तर आघाडीला 6 जागा
उस्मानाबाद : भूम : 19 जागांपैकी राष्ट्रवादीला 15 तर काँग्रेसला 4 जागा
सातारा : म्हसवड नगरपालिका : राष्ट्रवादी, भाजप आणि रासप आघाडीला 10 तर काँग्रेसला 7 जागा
सिंधुदुर्ग : देवगड : काँग्रेस 10, शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 1, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी, काँग्रेसचे योगेश चांदोसकर नगराध्यक्ष
बीड : परळी नगरपालिकेत 33 पैकी पहिल्या 6 जागा राष्ट्रवादीला, भाजपाकडे अद्याप एकही सीट नाही
नाशिक : पलूस नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा : काँग्रेस 12, स्वाभिमानी 4, भाजप 1, काँग्रेसचे राजू सदामते नगराध्यक्ष
सोलापूर : दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी, भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली
सातारा : खंडाळा : राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7 आणि इतरांना 1 जागा
कोल्हापूर : गडहिंग्लज : जनता दल 11, राष्ट्रवादी 4, भाजपला 2 जागा, जनता दलाच्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी
विक्रमगड नगरपंचायत : श्रमजीवी संघटनेच्या जागृती परिवर्तन पॅनल 6, विक्रमगड विकास आघाडी आणि काँग्रेसला 7, भाजप 2, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादीला 1 जागा
जालना : भोकरदन : रावसाहेब दानवे यांना धक्का, काँग्रेसचे 5 उमेदवार विजयी
सांगली : कडेगावच्या 17 जागांपैकी काँग्रेस 10 तर भाजपला 7 जागा
नाशिक : भगूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला; अनिता करंजकर नगराध्यक्षपदी
कोल्हापूर : गडहिंग्लज : 12 जागांपैकी जनता दल 6, राष्ट्रवादी 4 आणि भाजपला 2 जागा
सावंतवाडी : शिवसेना 7, काँग्रेस 8, भाजप 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी, शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बबन साळगावकर यांचा विजय
सातारा : दहीवडी : काँग्रेस 11, राष्ट्रवादी 5 आणि इतर 1 जागेवर विजयी
रायगड : रोहा नगरपालिका : राष्ट्रवादीच्या नेहा पिंपळे आणि शिवसेनेच्या समीक्षा बामणे विजयी
पालघर : मोखाडा नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता, शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 02, काँग्रेस 01, भाजपला 01 जागा
रायगड : रोहा : राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये चुरस, नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष पोटफोडे आघाडीवर, संदीप तटकरे पिछाडीवर
रायगड : रोहा नगरपालिका : राष्ट्रवादीच्या नेहा पिंपळे आणि शिवसेनेच्या समीक्षा बामणे विजयी
बीड : परळीमध्ये पहिला कौल राष्ट्रवादीला, दोन उमेदवार विजयी
पालघर : तलासरी नगर पंचायत : 17 जागांपैकी, माकपाचे 11, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी
चंद्रपूर : सिंदेवाही नगरपालिकेत भाजपाची सत्ता, 17 पैकी 11 जागांवर भाजपा विजयी तर 5 जागा काँग्रेसकडे
सातारा : वडूजमध्ये : राष्ट्रवादी 5, काँग्रेस 5, भाजप 3 आणि इतर 4 जागांवर विजयी
सावंतवाडीत दीपक केसरकरांना धक्का : शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 8, भाजपचे 1 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी
सांगली : कडेगाव नागपंचायतीमध्ये भाजपचे 6 आणि काँग्रेसचे 6 उमेदवार विजयी
अहमदनगर : पाथर्डीत भाजप 12 तर राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी
सांगली : इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर, शिवसेनेचे शकील सय्यद प्रभाग 2 मधून विजयी, विकास आघाडीचे बाबासाहेब सूर्यवंशी प्रभाग 3 मध्ये विजयी, विकास आघाडीच्या सुप्रिया पाटील प्रभाग 3 मध्ये विजयी
सातारा : रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी, राष्ट्रवादीचे आनंद कोरे नगराध्यक्ष
सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायत : स्वाभिमानी आघाडी 12, परिवर्तन आघाडी 4, अपक्ष-1
दापोली नगरपंचायत : 6 पैकी 4 राष्ट्रवादीला जागा तर शिवसेनेला 2 जागा
रायगड : शिवसेना चार जागांवर शिवसेना विजयी, प्रसाद सावंत, रुपाली आखाडे, प्रियांका कदम, राजन शिंदेंचा विजय
देवगड नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 1 मधून काँग्रेसचे संजय तारकर, प्रभाग 2 मधून भाजपच्या प्राजक्ता घाडी, प्रभाग 3 मधून काँग्रेसच्या विशाखा पेडणेकर आणि प्रभाग 4 मधून अपक्ष उमेदवार नीरज घाडी विजयी
मालवण : प्रभाग क्रमांक 1 अ मधून राष्ट्रवादीच्या दर्शना कासवकर, प्रभाग ब मधून काँग्रेसचे मंदार मोहन केणी विजयी, तर नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार दीपक पाटकर 150 मतांनी आघाडीवर
जालना : परतूर नगरपालिका : मंदाताई लोणीकर 250 मतांनी मागे
सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक : 9 जागांपैकी 8 जागांवर स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
परभणी - पूर्णा नगरपालिका प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीचे हाजी कुरेशी आणि चांद बागवान विजयी
सोलापूर : बार्शी प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीचे पृथ्वीराज राजपूत आणि कल्पना गायकवा हे दोन्ही उमेदवार विजयी
जालना : परतूर नगरपालिकेत बबनराव लोणीकरांच्या पत्नी मंदाताईंची मुसंडी, 150 मतांनी आघाडीवर
कोल्हापूर : कागल नगरपालिकेत भाजपचे 2 उमेदवार विजयी
रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेच्या 17 जागांपैकी शिवसेनेला 3 तर भाजपला 1 जागा
रत्नागिरी : दापोली नगरपंचायत 17 जागांपैकी राष्ट्रवादी 2, काँग्रेस, 2 आणि शिवसेनेला 2 जागा
परतूर नगरपालिका: बबनराव लोणीकरांच्या पत्नी पिछाडीवर, काँग्रेसच्या विमल जेथलिया 300 मतांनी पुढे
सांगली : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या चारही प्रभागात स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार विजयी
- कवठेमहांकाळ प्रभाग 2 मधून शेवता शेंडगे विजयी
- कवठेमहांकाळ प्रभाग 1 मधून चंद्रशेखर सगरे विजयी
- कवठेमहांकाळ प्रभाग 3 मधून साधना कांबळे विजयी
- कवठेमहांकाळ प्रभाग 4 मधून सविता महावीर माने विजयी
मालवण नगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खात उघडलं, प्रत्येकी दोन उमेदवार विजयी
पन्हाळा विकास आघाडीचे 2, शाहू विकास आघाडीचे 3, जनसुराज्य पक्षाचे 12 उमेदवार विजयी, तर जनसुराज्य पक्षाच्या रुपाली धडेल पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष
उमरगामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये दोन्ही जागेवर भाजपा विजयी. तर प्रभाग क्र. 2 मध्ये दोन्ही जागेवर काँग्रेस विजयी
मनमाडमध्ये पहिला कौल शिवसेनेला, प्रभाग 1 मध्ये 2 जागांवर शिवसेना
मनमाडमध्ये मतमोजणीला सुरुवात
--------------------------------------
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे. आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात प्रथमच मतदान झालं आहे.
147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती आली आहे.
ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोण पराभूत होणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही तासच उरले आहे.
दरम्यान, यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचीही चाचणी घेणारी ही निवडणूक मानली जात आहे.
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण आकडेवारी
एकूण प्रभाग – 1,967
सदस्यपदांच्या जागा – 3,705
थेट नगराध्यक्षपदांच्या जागा – 147
एकूण मतदान केंद्रे- 7,641
एकूण मतदार – 58,49,171
पुरुष मतदार – 30,20,683
स्त्री मतदार – 28,28,263
इतर मतदार – 225
सदस्यपदांसाठी उमेदवार – 15,826
बिनविरोध विजयी सदस्य – 28
थेट नगराध्यक्षपदांसाठीचे उमेदवार – 1,013
मतदानाची वेळ – स. 7.30 ते सा. 5.30
मतमोजणी – 28 नोव्हेंबर 2016
मतमोजणीची वेळ – सकाळी दहापासून
या दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीच्या निकालाआधी अनेक दिग्गज नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण काही आमदारांच्या पत्नीच नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
– पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना त्यांच्या पत्नी मंदाताई यांच्यासाठी परतूरमध्ये प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांना कडवी लढत द्यावी लागली.
– अमरावतीमधील दर्यापूरचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नीलिम भारसकळे यांच्या विरोधात त्यांचे दीर सुधाकर भारसाकळे अशी लढत झाली.
– माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक या पुसदमधून आणि विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांच्या पत्नी जयश्रीबेन यांचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून नगराध्यक्ष होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
– जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर नगरपालिकेत अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता यांच्याविरोधात माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांच्यातील लढतीकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे.
– संगमनेरमध्ये विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गा या नगराध्यक्ष होणार की नाही, हे निकालानंतर ठरणार आहे.
– माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या त्या बहिण असल्याने थोरात यांनीही त्यांचा प्रचार केला. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नीही जालन्यातून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याने त्यांचीही धाकधूक वाढली आहे.
– आईसाठी मंत्री जयकुमार रावलांची प्रतिष्ठा पणाला रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री राजकुमार रावल हे अनेक दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत. कारण धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून त्यांच्या आई नयनकुवरताई रावल नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांच्याविरोधात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ रवींद्र देशमुख हे उभे आहेत. येथे चुरशीचा सामना झाल्याने रावल यांना प्रचारासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. रावल आणि डॉ. हेमंत देशमुख हे दोघेही आमदार होण्यापूर्वी नगराध्यक्षच होते.
– राज्यातील भाऊबंदकीचा निकाल चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन भाऊ आमनेसामने आहेत. भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ सतीश धोटे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने अरुण धोटे यांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे केले आहे.
– बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबीयात भाऊबंदकीने डोकं वर काढलं आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप यांनी चुलत्यांच्या सत्तास्थानाला आव्हान दिलं आहे.
– राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनाही त्यांचा पुतण्या कुणाल पाटील यांनी भाजपकडून आव्हान दिलं आहे.
– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप याने शिवसेनेत प्रवेश करून रोह्यात काकालाच आव्हान दिलं. परळीतील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या बहिण भावात चुरशीची लढत आहे.
– नवीन पिढीचा राजकीय निकाल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण्यांची नवीन पिढीचंही राजकीय भवितव्य ठरणार आहे. दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा या श्रीरामपूरमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
– तासगावमध्ये दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
– अहमदनगर जिल्ह्यातील राहत्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली.
– करमाळ्यात माजी आमदार जयंतराव जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप हे नगराध्यक्षापदासाठी रिंगणात होते. बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश हे नगरसेवक होणार की नाही, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
– शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू संजय यांचाही मेहकरमधून नगरसेवकपदाचा निकाल लागणार आहे.
– भुसावळमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांचा मुलगा सचिन नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे.
मतदानाची विभागनिहाय टक्केवारी
कोकण विभाग:
पालघर (3)- 80 टक्के
रायगड (9)- 88 टक्के
रत्नागिरी (5)- 88 टक्के
सिंधुदुर्ग (4)- 67 टक्के
पुणे विभाग:
सातारा (14)- 83 टक्के
सांगली (8)- 84 टक्के
सोलापूर (9)- 73 टक्के
कोल्हापूर (9)- 79 टक्के
नाशिक विभाग:
नाशिक (6)- 79 टक्के
धुळे (2)- 70 टक्के
नंदुरबार (1)- 74 टक्के
जळगाव (13)- 68 टक्के
अहमदनगर (8)- 83 टक्के
औरंगाबाद विभाग:
जालना (4)- 59 टक्के
परभणी (7)- 76 टक्के
हिंगोली (3)- 68 टक्के
बीड (6)- 74 टक्के
उस्मानाबाद (8)- 68 टक्के
अमरावती विभाग:
अमरावती (9)- 72 टक्के
अकोला (5)- 67 टक्के
बुलडाणा (9)- 79 टक्के
वाशिम (3)- 64 टक्के
यवतमाळ (8)- 60 टक्के
नागपूर विभाग:
वर्धा (6)- 60 टक्के
चंद्रपूर (5)- 63 टक्के
एकूण सरासरी– (164)- 70.
धुळे
दोंडाईचा :- 70 टक्के
शिरपूर :- 70 टक्के
सरासरी 70 टक्के
उस्मानाबाद
उस्मानाबाद – 60.24 टक्के
तुळजापूर – 85.57 टक्के
नळदुर्ग – 71.49 टक्के
उमरगा – 64.51 टक्के
मुरूम – 66.98 टक्के
कळंब – 72.05 टक्के
भूम – 75.16 टक्के
परंडा – 76.31 टक्के
सरासरी– 71.72 टक्के
रायगड
अलिबाग – 70 टक्के
उरण – 68.31 टक्के
रोहा – 80.32 टक्के
खोपोली – 72.95 टक्के
पेण – 74.15 टक्के
मुरुड – 76.22 टक्के
रोहा – 80.32 टक्के
श्रीवर्धन 72.73 टक्के
महाड – 72.43 टक्के
माथेरान – 88 टक्के
सरासरी 75.01
रत्नागिरी
राजापूर नगरपरिषद- 76.38 टक्के
दापोली नगरपंचायत- 73.13 टक्के
खेड नगरपरिषद- 78.66 टक्के
चिपळुण नगरपरिषद – 72.00 टक्के
रत्नागिरी नगरपरिषद- 64.70 टक्के
सिंधुदुर्ग
सावंतवाडी- 67.41 टक्के
मालवण- 73.44 टक्के
वेंगुर्ला- 78 टक्के
देवगड – 75 टक्के
कोल्हापूर
इचलकरंजी – 76.67 टक्के
जयसिंगपूर – 77.66 टक्के
कुरुंदवाड – 85.8 टक्के
पेठवडगाव – 87.59 टक्के
मलकापूर – 86.11 टक्के
पन्हाळा – 92.84 टक्के
कागल – 87.51 टक्के
मुरगूड – 90.13 टक्के
गडहिंग्लज – 80.3 टक्के
सरासरी 79.39 टक्केवारी
अहमदनगर
शिर्डी नगरपंचायत – 83 टक्के
राहाता – 83.75 टक्के
श्रीरामपुर – 75 टक्के
कोपरगाव – 74.56 टक्के
संगमनेर – 74.26 टक्के
वाशिम
वाशिम- 65.16 टक्के
मंगरुळपिर- 65.13 टक्के
कारंजा- 61.89 टक्के
जालना
जालना 54 टक्के
अंबड 75.1 टक्के
भोकरदन 72.56 टक्के
परतूर 76.46 टक्के
सरासरी 69.53 टक्के
यवतमाळ
उमरखेड : 66.33 टक्के
दारव्हा : 70.73 टक्के
आर्णी : 68.11 टक्के
घाटंजी : 75.62 टक्के
चंद्रपूर
बल्लारपूर 66 टक्के
मूळ 68.78 टक्के
वरोरा 63.96 टक्के
राजुरा 71 टक्के
सरासरी 67.43 टक्के
वर्धा
आर्वी 61.72 टक्के
पुलगाव 66.43 टक्के
सिंदी रेल्वे 80.33 टक्के
बीड
बीड – 64.13 टक्के
अंबेजोगाई – 76.53 टक्के
परळी – 68.6 टक्के
माजलगाव – 75.61 टक्के
गेवराई – 78.71 टक्के
धारुर – 73.67 टक्के
सरासरी 69.88 टक्के
परभणी
सोनपेठ – 80.30 टक्के
पाथरी – 76.87 टक्के
गंगाखेड – 58.91 टक्के
पूर्णा – 74.29 टक्के
मानवत -78.17 टक्के
सेलू -73.33 टक्के
सोलापूर
करमाळा 78.25 टक्के
दूधनी 72.30 टक्के
बार्शी 73 टक्के
कुर्डुवाडी 73.08 टक्के
मंगळवेढा 76.57 टक्के
अक्कलकोट 71.67 टक्के
मैंदर्गी 74 टक्के
जालना
जालना 54 टक्के
अंबड 75.1 टक्के
भोकरदन 72.56 टक्के
परतूर 76.46 टक्के
सरासरी 69.53 टक्के
बुलडाणा
देवुलगाव राजा 73.25 टक्के
बुलढाणा 54.40 टक्के
मलकापुर 69.33 टक्के
नांदुरा 79.23 टक्के
शेगाव 74.73 टक्के
मेहकर 70.71 टक्के
जळगाव जामोद 69.11 टक्के
खामगांव 71 टक्के टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement