एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अजित पवारांनी बारामतीचा गड राखला!
![अजित पवारांनी बारामतीचा गड राखला! Nagarpalika Result Ncp Won 35 Seats Out Of 39 In Baramati अजित पवारांनी बारामतीचा गड राखला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/01/22150844/Ajit-Pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा गड राखला. 39 जागांपैकी 35 जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.
पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर रोजी 2 जिल्ह्यातील 14 नगरपालिकांसाठी मतदान झालं होतं. या सर्व नगरपालिकांचा निकाल आज जाहीर झाला.
पहिल्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत बारामतीच्या 39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर होतं.
परंतु अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीने 39 पैकी 35 जागांवर विजय मिळवलाच, शिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे यांचा विजय झाला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)