एक्स्प्लोर

MVA Seat Sharing In Maharashtra : अखेर 'वंचित'शिवाय महाविकास आघाडीचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! ठाकरेच मोठा भाऊ असणार

महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय (Vanchit Bahujan Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला (MVA Seat Sharing In Maharashtra) जवळपास निश्चित केला आहे.

MVA Seat Sharing In Maharashtra : वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्थावांवर प्रस्ताव आणि अटी शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय (Vanchit Bahujan Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला (MVA Seat Sharing In Maharashtra) जवळपास निश्चित केला आहे. त्यामुळे वंचितकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास लवकरच महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होऊन जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने महाविकास आघाडीकडून जागावाटपावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे मोठा भाऊ 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीने जागावाटपावर जवळपास शिकामोर्तब केलं आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट हा मोठा भाऊ असणार आहे. ठाकरे गट राज्यांमध्ये 22 जागा लढवणार असून शरद पवार गट 10 जागांवर, तर काँग्रेस 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून हातकणंगले जागा राजू शेट्टी यांना सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, सांगली जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरुच आहे. 

वंचितकडून तब्बल 17 जागांचा प्रस्ताव

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे तब्बल 17 जागांचा प्रस्ताव आल्याने तो अशक्यप्राय असल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. महाविकास आघाडी वंचितला कोणताच नवीन प्रस्ताव देणार नसून त्यांनी निर्णय घेतल्यानंतर विचार केला जाईल, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमत केलं आहे. 

त्यानंतरच आम्ही सकारात्मक चर्चा करू

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने अजूनही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असले, तरी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भूमिका पाहता महाविकास आघाडीत ते खरंच येत आहेत की न येण्यासाठी कारणांची मालिका उपस्थित करत आहेत? अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी निर्णय घेऊन आम्हाला कळवावे, त्यानंतरच आम्ही सकारात्मक चर्चा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे आता वंचित काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget