एक्स्प्लोर

राज्यातील 56 शहरात मुस्लिमांचे सर्वेक्षण होणार? फडणवीस म्हणतात, तसा कोणताही निर्णय नाही

Muslim Survey : राज्यातील 56 शहरात मुस्लिम समुदायासंबंधी सर्वेक्षण होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायासंबंधी सर्व माहिती गोळा करण्यात येणार आहे. 

मुंबई : मुस्लिमांचे आरक्षण रद्द करणाऱ्या फडणवीस- शिंदे सरकारने राज्यातील 56 शहरांत मुस्लिम कुटुंबाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. नऊ वर्षापासून हे सर्व्हेक्षण रखडले होते. उत्तर प्रदेश मध्ये मदरशांचे सर्वेक्षण सूरू आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे दोन धर्मातला तणाव कमी करण्यासाठी देशांतल्या मुस्लिम नामवंतांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे भाजपा आणि संघ मुस्लिमांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या सर्वेक्षणाचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

शिंदे फडणवीस सरकार नांदेड-औरंगाबाद-सोलापूर सारख्या 56 शहरात मुस्लिमांचे पाहणी करणार असल्याची माहिती आहे. मुस्लिम कसे राहतात? त्यांचे शिक्षण, मुस्लिम वस्तीतल्या पायाभूत सुविधा, आरोग्य, रोजगार, बँका आणि वित्तीय सहाय्य, शासकीय योजनांचा लाभ अशी माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती आहे. 

सन 2013 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होतं, तेव्हा मोहंमद उर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समुदायाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी अभ्यास गट नेमला होता. या अभ्यास गटाने मुस्लिम समुदायाची पाहणी करण्यात यावी अशी राज्य सरकारला शिफारस केली होती. त्यावर गेली दहा वर्ष काहीच झालं नाही. तीन महिन्यापूर्वी आलेल्या सरकारने हा निर्णय घेतल्याने यामागे कोणतं राजकारण आहे असा कयास बांधला जाऊ लागला आहे.

राज्यात मुस्लिम बहुल 56 शहर आहेत. राज्यात मुस्लिम समुदायाची 10.6 टक्के लोकसंख्या आहे. 70 टक्के लोकसंख्या शहरात राहते. एक पंचमांश ग्रामीण भागात राहते. मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 21.6 टक्के मुस्लिम लोकसंख्या  ग्रेटर मुंबईमध्ये आहे. शासकीय सेवेत मुस्लिमांचे केवळ 11 टक्के प्रतिनिधित्व आहे. 70 टक्के लोक कुशल काम करतात. सरकारच्या निर्णयावर मुल्ला मौलवी, तरूण- तरूणी काय म्हणतात हेही एबीपी माझाच्या राज्यभरातला टीमने जाणून घेतले आहे.

नरेंद्र मोदी-अमित शहांच्या राजकारणाचा धार्मिक धृवीकरण हा स्थायीभाव आहे. 2014-2019 च्या निवडणूकीत याचा भाजपाला फायदा झाला आहे. उत्तरप्रदेश सारखे राज्य योगींनी पुन्हा जिंकले त्यामागे बहुसंख्य हिंदूची मते हे कारण आहे. परंतु नुपूर शर्मा प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळींवर भाजपाला मोठा विरोध सहन करावा लागला. देशात सुध्दा वातावरण तंग आहे

हे ओळखूनच संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी 75 मिनिटे संघाच्या दिल्ली कार्यालयात माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, नजीब जंग, आरएलडी नेते नजीब जंग, शाहू मशिदीचे मुख्य इमाम यांची भेट घेतली. दोन्ही धर्मात सतत संवाद व्हावा अशी व्यव्सथा केली जाणार आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांशी स्नेह वाढवा, मुस्लिमांतल्या ओबीसींशी बोला असे सांगितले आहे. 

राज्याच्या इतर भागात कुठे किती मुस्लिम? 

मुस्लिमांची राज्यामध्ये कुठे किती लोकसंख्या- ठाणे 8.6 टक्के, औरंगाबाद 5.5 टक्के, नाशिक 5.1 टक्के, जळगाव 4.4 टक्के, नांदेड 3.8 टक्के, सोलापूर 3.7 टक्के, अमरावती 3.4 टक्के, नागपूर 2.9 टक्के, अकोला 2.9 टक्के, बुलढाणा 2.8 टक्के, , मुंबई 22 टक्के, ग्रेटर मुंबई 21.6 टक्के मुस्लिम आहेत. इतर जिल्ह्यात 21.75 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
Embed widget