Murlidhar Mohol VIDEO : मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
Murlidhar Mohol On Majha Katta : गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची संधी दिली, पण त्यावेळी पराभूत झालो. आजचं यश पाहायला मुंडे साहेब असायला हवे होते असं सांगताना मुरलीधर मोहोळ भावुक झाले.
मुंबई: पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असा प्रवास करताना सर्वात जास्त आठवण येते ते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची, आजचा दिवस बघायला ते हवे होते असं सांगताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) भावुक झाले. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यावर मुलासारखं प्रेम केलं, त्यांच्यामुळेच आपण घडलो असं मोहोळ म्हणाले. पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर थेट केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मुरलीधर मोहोळ एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आतापर्यंतचा प्रवास उलगडला.
गोपीनाथ मुंडेसाहेब आज असायला हवे होते
गोपीनाथ मुंडे साहेब लोकनेते म्हणून त्यांचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत एक पीढी घडली. मुंडे साहेबांनी आपल्यावर मुलासारखं प्रेम केलं असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. ते म्हणाले की, या सगळ्या आनंदामध्ये सर्वात मिस करतोय ते गोपीनाथ मुंडे साहेबांना. मी त्यांच्या खूप जवळचा होतो. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळे राहून-राहून वाटतं की आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आजचा दिवस बघायला ते असायला हवे होते.
गोपीनाथ मुंडेंनी कानमंत्र दिला अन्...
गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आठवण सांगताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता अशी मुंडे साहेबांची ओळख होती. 2009 साली त्यांनी आदेश दिला आणि मी खडकवासला विधानसभा निवडणूक लढली. पण पराभव झाल्यानंतर भीतीमुळे मी मुंडे साहेबांच्या समोर जात नव्हतो. असं दोन-तीनवेळा झाल्यानंतर मुंडे साहेबांच्या ते लक्षात आलं. पुण्यात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की त्यांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक ते हरले होते. त्यामुळे कसलाही विचार करू नकोस, कामाला लाग. त्यानंतर आजचा दिवस उजाडला. त्यामुळे आजच्या दिवशी मुंडे साहेबांची खूप आठवण येते.
संघटनेत न्याय मिळतोच
महापौर म्हणून काम करताना शहराचा आवाका माहिती होता, त्याचा फायदा झाल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. 2009 साली खडकवासलामधून विधानसभा निवडणूक लढवली. रमेश वांजळे हे समोर होते, त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं म्हणून निवडणूक लढलो, पण पराभव झाला. 2014 साली संधी मिळाली नाही, त्यावेळी मेधाताई कुलकर्णींना संधी दिली. 2019 सालीही अशीच संधी हुकली. पण आता थेट खासदारपदाची संधी मिळाली. त्यामुळे काही ना काही संधी मिळतेच. संघटनेत काम करताना काही ना काही न्याय मिळतोच.
या बातम्या वाचा:
- Murlidhar Mohol : ए रांXX, नेता व्हायला कोल्हापुरात आलास का? पहिल्याच निवडणुकीत विरोधी गटाकडून धमकी; मुरलीधर मोहोळांनी सांगितला तो किस्सा
- पोलिस फौजदार व्हायचं स्वप्न होतं, पण नापास झालो, मुरलीधर मोहोळांनी मनातलं सगळंच सांगितलं
Murlidhar Mohol on Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे यांची आठवण, अण्णांनी सांगितली भावनिक आठवण