एक्स्प्लोर

मुंबईत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई, सुधारित मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना 

Mumbai Traffic News : "मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Mumbai Traffic News : वाहतूक पोलिसांकडून मुंबईत सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत वाहतुकीचे नियम मोडले तर कठोर कारवाई होणार आहे. मोटर वाहन निरीक्षक भरतीतील उमेदरवारांना गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) सरकारी 'वर्षा' या निवास्थानी नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी मोटार वाहन कायद्याची (Motor Vehicle Act) काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशा सूचना दिल्या आहेत. 

"मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी. रस्त्यावर गाडी चालवताना बेशिस्त वाहन चालवून अपघात करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्यासारख्या कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विरवरून दिली आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबईत पुन्हा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणारंवर कठोर कारवाई सुरू केली आहे. मुंबई शहरात अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारमध्ये सर्वांना सीट बेल्ट लावणे आणि दुचाकी वाहनावर दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे, त्यामुळे आता जर वाहन चालवताना मुंबईमध्ये वाहन चालकांनी वाहतूक नियम मोडले तर पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाई संदर्भांत सह पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी माहिती दिली आहे.  
 
31 ऑक्टोबर 2022 पासून मागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. सक्तीच्या नियमानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं पहिले 14 दिवस या नियमाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात कारवाई करण्यास सुरूवात केली.  15 नोव्हेंबर 202 पासून चार दिवसांत मुंबईत कारमध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्या 12 हजारपेक्षा अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती. त्यामुळे मुंबईत यापुढे चारचाकी वाहनातून प्रवास करताना मागच्या सीटवरील प्रवाशांना देखील सीटबेल्ट लावावा लागणार आहे. शिवाय दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालावे लागणार आहे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

Drink and Drive: ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करणं भोवलं; मुंबई पोलिसांकडून 156 जणांवर कारवाई 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : कोर्टात कोरटकरला घाम फुटला; सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 25 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : दुसऱ्या दरवाजाने कोरटकर कोर्टात, शिवप्रेमी संतप्त, पायताण देऊन घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Embed widget