एक्स्प्लोर
पावसामुळे मैदानाऐवजी रस्त्यांवर सभा घेण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल (09 ऑक्टोबर) पुण्यात आयोजित केलेली राज ठाकरे यांची सभा मुसळधार पावसामुळे रद्द केली. त्यानंतर आज मुंबईतल्या सभेत राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल (09 ऑक्टोबर) पुण्यात आयोजित केलेली राज ठाकरे यांची सभा मुसळधार पावसामुळे रद्द केली. त्यानंतर आज मुंबईतल्या सभेत राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. दरम्यान, पावसामुळे मैदानं ओली झाली असल्याने शहरातील रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? लावरे तो व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे कोणते नवे व्हिडीओ दाखवणार?ईडीच्या चौकशीनंतर होणारी राज ठाकरेंची ही पहिली सभा आहे. त्यामुळं राज यांची तोफ ईडीच्या मुद्यावर धडाडणार का? भाजपनं कलम 370 ला प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. याचा राज ठाकरेंकडून खरपूस समचार घेतला जाईल का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.
राज ठाकरेंची पुण्यात सभा, मात्र मैदानात चिखलाचं साम्राज्य | ABP Majha
पुण्यातील नातूबागमध्ये काल राज ठाकरेंची पहिली सभा होणार होती, मात्र तुफान पावसामुळे स्टेज आणि खुर्च्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, सभास्थळी आलेल्या कार्यकर्त्यांना खुर्च्या डोक्यावर घेऊन उभं राहावं लागलं होतं. ईडी चौकशीनंतर राज ठाकरे काल पहिल्यांदाच जनतेला संबोधणार होते, त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचं या भाषणाकडे लक्ष होतं. दरम्यान, आज मुंबईत राज ठाकरेंच्या सांताक्रुझ आणि गोरेगावमध्ये सभा होणार आहेत.
10 आणि 11 तारखेला राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
