एक्स्प्लोर
पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा, एक्सप्रेस अडकल्या, लोकलसेवाही ठप्प
मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस मुंबईबाहेरच्या स्टेशनांवर अडकल्या आहेत. तर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अनेक एक्सप्रेस रद्द झाल्या आहेत. सोबतच लोकलसेवा देखील प्रभावित झाली असून मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक अद्यापही ठप्प आहे.
मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र येत्या काही तासात हा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस मुंबईबाहेरच्या स्टेशनांवर अडकल्या आहेत. तर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अनेक एक्सप्रेस रद्द झाल्या आहेत. सोबतच लोकलसेवा देखील प्रभावित झाली असून मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक अद्यापही ठप्प आहे.
कल्याण, अंबरनाथ आणि बदलापुरातल्या रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. कालपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय. अनेक सखल भागात त्यामुळं पाणी साचलंय आहे. गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबईत तिन्ही मार्गावरील लोकलसेवा देखील प्रभावित झाली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर लोकलसेवा बाधित झाली असून हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही ठप्प आहे. कल्याण, अंबरनाथ आणि बदलापुरातल्या रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. मुसळधार पावसामुळं सायन स्टेशनमध्ये पाणी साठलं आहे. गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
सिंहगड एक्सप्रेसमधे प्रवासी अडकले
मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन काल संध्याकाळी सव्वा पाच ऐवजी रात्री सव्वा नऊ वाजता सीएसटी वरुन निघाली. ही ट्रेन कर्जत - खोपोलीच्या जवळ आली असता थांबवण्यात आली. पुढं घाटामध्ये दरड कोसळल्याने ट्रेनचा मार्ग बदलण्यात येत असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यानंतर ही ट्रेन कल्याणला नेण्यात आली आणि तिथं प्रवाशांना डेक्कन क्वीनमधून उतरवून सिंहगड एक्सप्रेसमधे बसवण्यात आलं. ही सिंहगड एक्सप्रेस कसारा घाटातून पुण्याला जाईल असं प्रवाशांना सांगण्यात आलं. रात्री तीन वाजता ही ट्रेन कल्याणहून निघाली. मात्र ही ट्रेन कसारा घाटाच्या खाली उंबरमाली गावाजवळ थांबवण्यात आली. पुढं दरड कोसळल्याने ट्रेन थांबवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तेव्हापासून ही ट्रेन आणि ट्रेनमधले प्रवासी अडकून पडले आहेत. पाणीही प्यायला मिळत नसल्याचं प्रवाशांनी सांगितलं.
इगतपुरीला दुरांतो अडकली
दरम्यान नागपूरवरून मुंबईकडे येणारी दुरांतो एक्सप्रेस देखील इगतपुरीमध्ये अडकली आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कसारा घाटात रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे दुरांतो एक्सप्रेस पहाटे पाच वाजेपासून इगतपुरी स्टेशनवर उभी आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळं पुणे ते मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंद्रायणी आणि इंटरसिटी आजसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement