Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार; MSRDC चा प्रस्ताव, वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळाचा निर्णय
Maharashtra News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच आठपदरी होणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव MSRDC च्या वतीनं राज्य सरकारला पाठवण्या आलाय. वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळानं निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
![Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार; MSRDC चा प्रस्ताव, वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळाचा निर्णय Mumbai Pune expressway to be eight lane MSRDC proposal to Maharashtra Government road corporation decision due to increased traffic congestion Know details Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार; MSRDC चा प्रस्ताव, वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/c31280e8d61db8e0c16420db83b03a981680071920373648_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai-Pune Expressway Will Be Eight-Lane : मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) लवकरच आठपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Road Development Corporation) राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यानं एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हा मार्ग आठ पदरी करणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल. एकीकडे, वेगानं काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून (Mumbai News) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आता आठ पदरी करण्यात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं राज्य सरकारला मंजुरीसाठी दिला आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, राज्य सरकारनं मंजुरी दिल्यानंतर काम सुरू झाल्यापासून पुढच्या तीन वर्षांत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्याचं काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 94.5 किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग बांधण्यात आला होता. वर्ष 2002 मध्ये हा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला. या महामार्गामुळे चार ते पाच तासांचा मुंबई-पुण्याचा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांत पूर्ण करता येतो. राज्यभरातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गांपैकी मुंबई-पुणे महामार्ग एक समजला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महामार्गावरुन दररोज तब्बल एक लाख 55 हजार वाहानं धावतात. मात्र आता या महामार्गाचा वापर वाढू लागला असून यावर वाहानांची वर्दळ वाढू लागली आहे. तसेच, अनेकदा या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीही पाहायला मिळते. याच सर्व अडचणींवर तोडगा म्हणून आता रस्ते विकास महामंडळानं मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
दरम्यान, मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 94.5 किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या या मार्गामुळे सुसाट वेगानं प्रवास करण्याची ओळख नागरिकांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास 4-5 तासांवरून 2 तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहनं, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहनं एक्सप्रेसवेचा वापर करतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)